अकोला (योगेश नायकवाडे) दि. ३ सप्टेंबर , २०२० गुरुवार रोजी अशिया खंडातील मुलींची पहीली शाळा वाचविण्यासाठी व राष्ट्रीय स्मारक घोषीत करावे यासाठी “आई सावित्रीमाई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती, महाराष्ट्र माळी युवक संघटना ,महात्मा फुले ब्रिगेड , श्रीराम प्रतिष्ठान अकोला , अखिल भारतिय माळी महासंघ , संत सावता माळी युवक संघ, म.फुले समता परिषद , महाराष्ट्र राज्य धोबी सेवा मंडळ , छत्रपति प्रतिष्ठान अकोला , संभाजी ब्रिगेड , अखिल भारतीय छावा संघटना,आदिवासी विकास समाज मंडळ ,राजमाता अहिल्या ब्रिगेड अकोला ,समस्त फुले प्रेमी वतीने मा. जिल्हधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले…..
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व माई सावित्रीआई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहीली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे हे ठिकाण शासनाने तात्काळ भूसंपादीत करून “राष्ट्रीय स्मारक ” म्हणुन घोषीत करून विकसीत करावे…..
देशातीलच नव्हे तर संपुर्ण आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा प्रसिद्ध आहे. राष्ट्रपिता – सत्यशोधक – तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी १ जानेवारी , १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरू केली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचविली. ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडी- अडचणींचा सामना करून , शेण – माती – चिखल विरोध पत्करून बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली.आज त्या भिडेवाड्यातील शाळेची अवस्था खुपच दयनीय झालेली आहे. हे तमाम फुले प्रेमींसाठी वेदनादायक आहे……
सदरील जागा शासनाने लवकरात लवकर भूसंपादीत करून त्या वास्तुला राष्ट्रीय स्मारक म्हणुन घोषीत करून विकसीत करावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपुर्ण महाराष्ट्रात ” आईसावित्री माई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती व समस्त फुले प्रेमीं “च्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी……
मा. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतांना आईसावित्री माई फुले राष्ट्रीय स्मारक संघर्ष समिती चे अकोला समन्वयक अक्षय नागापुरे यांचा नेतुरत्वात निवेदन देण्यात आले त्या वेळी मार्गदर्शक मनुन तुकाराम जी बिडकर, लक्ष्मण जी तायड़े,आशीषजी ढोमने , प्रकाश जी तायड़े, संजयजी गोटफोड़े, मनीषजी हिवराळे, संतोष जी हुशे , लक्षम निखाड़े, विजय इंगळे,यांचा मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले सोबत अकोला शहरातील महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे युवक नेते अभिलाष तायड़े, शहर उपाध्यक्ष अभिषेक बेलसरे, कार्यधक्ष अक्षय ईनामदार, सरचिटणीस नीलेश तायड़े, चिटनीस राहुल हळदे, प्रसिद्धि प्रमुख मंगेश घोड़े, शहर संघटक शिव ठाकरे,तालुका अध्यक्ष रविराज शेवलकार युवा कार्यकर्ता नीलेश लांडगे, युवा कार्यकर्ता सागर बोराडे अकोट, निखिल क्षीरसागर, पवन कोल्हे, नीलेश पाली,अक्षय कोरडे,
महात्मा फुले ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय बंड़, तेल्हारा तालुका अध्यक्ष रोशन बोंबटकर, मयूर निमकर्डे ,उपाध्यक्ष उमेश राखोंडे
महाराष्ट्र राज्य परिट धोबी समाज सेवा मंडळ अकोला युवक जिल्हाध्यक्ष शुभम डहाके,
छत्रपति प्रतिष्ठान चे अध्यक्ष विपुल माने, तुषार आवारे, ऋषिराज आमले,
अखिल भारतिय छावा संघटना महानगर अध्यक्ष शुभम धनभर, सामाजिक कार्यकर्ते हर्षल देशमुख, श्रीकांत जी गावंडे, कमल जी खरारे, गजु भाऊ रोकड़े,
सामाजिक कार्यकर्ता सोनूभाऊ गवई, राजमाता अहिल्या ब्रिगेड अकोला शहर अध्यक्ष उमेश पातोंड, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रशांत भारसाकळे,
आदिवासी समाजाचे कार्यकर्ते महेश जी गोंधळीकर सह राहुल देहलीवाले, कुणाल सपकाळ अविनाश बागड़े , सह
समस्त फुलेप्रेमी उपस्थित होते. सदर निवेदन शासनाच्या नियमात राहुन , मास्क लावुन देण्यात आले.