हिवरखेड (धीरज बजाज)-
कोव्हिड १९ चे रुग्ण दिवसे-दिवस वाढतच असुन कोरोना काही थांबायचे नाव घेईना. यामुळे सर्वसामान्यासह उद्योग धंदे अडचणीत सापडले आहेत. त्यातच गणेशोत्सव आला. गणेशोत्सव मध्ये मंडप डेकोरेशचा मोठ्या प्रमाणात झगमगाट असायचा. माञ कोरोनामुळे प्रशासनाने यावर निर्बंध घातले होते. याचा आर्थिक फटका बिछायत मंडप डेकोरेशनलाही बसला असुन हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
गणेशोत्सव आला म्हटले की मंडळाची लगबग असायची माञ यंदा कोरोणामुळे सार्वजनिक गणेशोत्सव दरवर्षी प्रमाणे भव्य दिव्य साजरा केला गेला नाही. गणेशोत्सव म्हटले कि आधी पासुनच काही दिवस बिछायत, मंडप, डेकोरेशन, रंगीबेंरगी विद्युत रोषनाईसाठी आधीपासुन बुकिंग असायची. माञ गणेशोत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा करीत असल्याने मंडप डेकोरेशनला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका तर बसलाच आहे माञ हा व्यवसाय सुद्धा आता अडचणीत सापडला आहे. अजुन किती दिवस कोरोनामुळे या व्यवसायांवर गदा राहणार आहे हे सध्या तरी कोणी सांगु शकत नाही. त्यामुळे आता शासनाच्या आधारावरच या व्यवासायीकांची आशा अवलंबुन राहीली आहे. तसेच मंडप व्यावसायीका बंरोबरच साऊंड, इलेक्ट्रिशियन, फुलवाले, वाहतुक करणारे वाहन, घोडावाले, आचारी, कॅटरर्स यासारख्या अनेकांचा रोजगार गेला आहे.
प्रतिक्रिया
रोगाच्या प्रादुर्भावामुळे व्यवसायाला पुर्णतः खीळ बसली असल्याकारणाने या व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या मालकावर कर्जबाजारीपणा ची वेळ आली असून यांचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडले आहे पर्यायाने शासनाने ठोस निर्णय घेऊन संबंधित सर्व व्यावसायिकांना आधार द्यावा
धिरज बजाज, उपाध्यक्ष बिछायत, मंडप डेकोरेशन असोसिएशन तेल्हारा तालुका.