मुर्तिजापुर (सुमित सोनोने)-तालुक्यातील लाखपुरी मधील शेतक-यांना सेवा सहकारी संस्था लाखपुरी ता.मुर्तिजापुर येथील सभासदाला विश्वासात न घेता चुकीच्या पध्दतीने सभासदाच्या पाठीमागे पुनर्गठन केले व पुर्नगठन केले असे सागण्यात येते परन्तु पुर्नगठनाचे पैसे सुध्दा शेतक-यांना दिले नाही.
असे व्यस्था दि.३१ जुलै रोजी उपविभगीय अधिकारी मुर्तिजापुर मोहीते साहेब यांच्या दालनामध्ये शेतक-यांनी मांडले यावेळी उपविभागीय अधिकारी मोहीते साहेब यांना शेतक-यानी यावेळी सांगितले की यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यावर निपक्ष पणे कारवाई व्हायला हवी व शेतक-याना शासनाच्या कर्ज माफी योजनेचा लाभ देण्यात याव्या असे शेतक-यानी व्यथा यावेळी मांडल्या पुनर्गठन झाल्यामुळे शेकडो शेतक-याना शासनाच्या कर्ज माफी योजनेच्या लाभा पासुन वंचीत राहावे लागले.यावर प्रशासन काय पाऊल उचलणार यावर शेकडो शेतक-यांचे लक्ष लागले आहे.या सदर निवेदनाच्या प्रति उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर ,उपनिबंधक सहकारी संस्था मुर्तीजापुर ,तहसीलदार साहेब मुर्तीजापुर यांना देण्यात आल्या सदर निवेदन देतांना प्रताप चव्हाण,गुणंवत इंगळे,शुभम चव्हाण,माणिकराव नवघरे,प्रदिप घनमुळे,श्रीराम श्रीनाथ,हरिदास कैथवास,संजय इंगळे,नारायण ढाकरे , नागोराव हिरुळकर,कमलाकर नवघरे,विनोद शोभा वर्घट, रामेश्वर पांगरकार,इ.शेतकरी निवेदन देतांना उपस्थीत होते.
माझे पुर्नगठन मला न विचारता करण्यात आले . त्यामुळे मला शासनाच्या कर्जामाफीचा योजनेचा लाभ मिळाला नाही. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यावर प्रशासनाने योग्य कठोर कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा हि अपेक्षा.
प्रतापसिंग चव्हाण
(शेतकरी लाखपुरी)
____________
प्रशासनाने सखोल चौकशी करुन याकडे लक्ष देवुन शेतक-यांना न्याय मिळुन द्यावा व यामध्ये दोषीवर कारवाई करुन शेतक-यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. जेण करुन शेतक-याना दिलासा मिळेल.
सौ.मिनल नवघरे
(पं.स.सदस्या लाखपुरी)