अकोट(देवानंद खिरकर) – कृषि विभाग व रासी सीड्स यांच्या संयुक्त विद्यमाने कापूस पिकावरील सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापने च्या दृष्टीने फिरते प्रचार रथ व ध्वनी प्रचार रथ उदघाटन तालुक कृषि अधिकारी ता.अकोट श्री.शिंदे साहेब,व श्री. विठ्ल थुल साहेब यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमाला निवासी आत्मा समितीचे मोगरे साहेब कृषि विस्तार अधिकारी व रासी सीड्स चे तालका प्रतिनिधी श्री.अक्षय गायकवाड,व श्री.रवींद्र पटांगे उपस्थित होते.कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी प्रति जागरूकता वाढवायचे आहे.सोबतच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकरी पाच कामगंध सापळे लावणे आवश्यक आहे.व त्या नुसार रासी सीड्स कडून कामगंध सापळे वाटप चालू आहे.मा.ता.कृषि अधिकारी महोदय यांनी प्रचार गाडीला हिरवी झेंडी दाखवून आज गाडीला रवाना केले.