तेल्हारा (प्रतिनिधी)- काल दिनांक ३१ ऑगस्ट रोजी हिवरखेड येथे एका ३० वर्षीय युवतीवर एका विकृत मानसिकतेच्या नराधमाने बलात्कार केला होता याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करून आज तेल्हारा दिवाणी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरखेड येथे आज दि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान हृदय पिळवणारी घटना घडली होती.येथील तीस वर्षीय मतिमंद अपंग युवतीचे आई वडील व भाऊ असे सकाळी कामानिमित्त बाहेर गेले असता अपंग व मतिमंद युवती ही एकटीच घरी आपल्या अंगणात खाटेवर झोपली असतांना हिवरखेड येथील मिलिंद नगर येथे राहणाऱ्या आरोपी संतोष सीताराम इंगळे या नराधमाने अत्याचार केला सदर घटनेची वाचता कोणाकडे फोडल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली परंतु सदर घडलेली घटना युवतीने आपल्या आई-वडिलांना सांगितली असता त्यांनी सर्वप्रथम हिवरखेड पोलीस स्टेशन गाठले परंतु कोरोना विषाणूचा हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत झालेला प्रसार लक्षात घेता सदर पोलीस स्टेशन चा कार्यभाग तेल्हारा पोलीस स्टेशन कडे वर्ग केला असल्याने पीडित युवतीच्या आईवडिलांनी युवतीसह तेल्हारा पोलीस स्टेशन गाठले घडलेल्या घटनेची तक्रार पीडितेच्या आईने पोलीस स्टेशन केला येथे दिली असता कलम ३७६(२)(१),५०६,४५२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर तपास अधिकारी अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटखेडे यांनी लगेच आरोपीला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत