• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावर एमआयएम, शिवसेना आमने-सामने

Media Desk by Media Desk
September 1, 2020
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
0
एमआयएम
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

औरंगाबाद : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत एमआयएमने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी एमआयएम मोहिम राबवणार असून मंदिरे खुली करण्यासाठी पुजा-यांना निवेदन देणार आहेत. तर मशिदी उघडण्याची मोहिम उद्यापासुन सुरू होणार असल्याचे एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन आता एमआयएम आणि शिवसेनेत वाद पेटला आहे. मंदिर उघडणारे जलील कोण?,असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तर हिंदू धर्माचा कोणीही ठेकेदार नाही, असे प्रत्युत्तर जलील यांनी खैरेंना दिले आहे.

इम्तियाज जलील यांनी यापूर्वीच सरकारला अल्टिमेटम दिला होता. तर आज त्यांनी पुन्हा ट्वीट करत ‘आज मंदिर, उद्या मशिद’, असे म्हटले आहे. मंदिरे उघडण्यासाठी एमआयएम औरंगाबाद मधील पुजा-यांना निवेदन देणार आहेत. तसेच मंदिरे खुली करण्याची विनंती करणार आहेत. मात्र यावर चंद्रकांत खैरेंनी आक्षेप घेतला आहे. “मंदिरे खुली करण्याची मागणी सरकारला केली असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री त्यावर निर्णय जाहीर करतील. त्यामुळे या मुद्द्यावरुन एमआयएमने राजकारण करू नये”,अशी टीका खैरेंनी केली आहे. यावर जलील यांनी प्रत्युत्तर देत “मंदिरात गेलो तरी त्याचे पावित्र्य राखणार आहोत. मंदिर व धर्मांना कोणीही आपली मक्तेदारी समजू नये”,असा टोला जलील यांनी खैरेंना लगावला. त्यामुळे या मुद्द्यावरुन आता एमआयएम आणि शिवसेना आमने-सामने आले आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

दरम्यान, इम्तियाज जलील यांनी याआधीच सरकारला अल्टिमेटम देत मंदिरे १ सप्टेंबरपर्यंत खुली करण्याची विनंती केली होती. १ सप्टेंबरला गणपती विसर्जन असल्याने हा दिवस हिंदू बांधवांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे १ सप्टेंबराला मंदिरे खुली करावीत आम्ही २ तारखेला मशिदी उघडणार, असा इशारा जलील यांनी सरकारला दिला आहे. मात्र मिशन बिगीन अगेना चौथा टप्पा सुरू झाला तरी सरकारने यावर कोणताच निर्णय न दिल्याने एमआयएमने यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Previous Post

कोरोनामुळे कर्ज वसुली स्थगितीचा कालावधी २ वर्षापर्यंत वाढू शकते; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

Next Post

194 अहवाल प्राप्त; 20 पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज, दोन मयत

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
akola corona updates

194 अहवाल प्राप्त; 20 पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज, दोन मयत

bacchu kadu

पालकमंत्री ना.बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.