अकोट(देवानंद खिरकर)-अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळातिल संत्रा उत्पादक शेतकरी यांनी कृषीमंत्री,पालकमंत्री,जिल्हाधिकारी,आमदार,यांना निवेदन दिले आहे.सन 2019 जुन,जुलै,ऑगस्ट,मधे अति व अनीयमता पावसामुळे शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला संत्रा फळ पिकाचा घास हिरावुन घेतला गेला आहे.त्यामूळे संत्रा उत्पादक शेतकरी पूर्णपणे हताश झलेलाआहे.अशातच अकोलखेड मंडळातील संत्रा उत्पादक शेतकरी यांनी संत्रा फळ पिकाचा विमा एच डी एफ सी इग्रो या विमा कंपनी कडे उतरविला होता.व तो विमा उमरा,पणज,या मंडळाला हेक्टरी 38500 रुपये प्रमाणे दि.12/3/2020 ला त्याचा परतावा शेतकर्याच्या खात्यात जमा सुध्दा झालेला आहे.व या विम्यामधुन फक्त अकोलखेड मंडळच वगळण्यात आले आहे.व अकोलकखेड मंडळातील शेतकर्यांना संत्राचा मृग बहारचा विम्याच्या लाभापासुन वंचित ठेवले आहे.या बाबत अकोलखेड मंडळातील शेतकरी यांनी वारंवार निवेदने दिली आहेत.परंतु सदर प्रकरणाची आज परंत सुध्दा दखल घेण्यात आलेली नाही.तरी अकोलखेड मंडळातील आम्हा शेतकर्यांना त्वरित पिकविम्याचा लाभ द्यावा अशी मागणी अकोलखेड मंडळातील संत्रा उत्पादक शेतकरी सागर भालतीडक,शुभम गावंडे,विष्णू पखाले,सुधिर भिल,शिरीष महल्ले,आदी शेतकरी यांनी केली आहे.