पंढरपूर :
श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठी आज (दि. 31) पंढपुरात वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. यामुळे मंदिर परिसराला छावणाचे स्वरुप आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर हे आंदोलनात सहभागी झाले असून येथे हजारोच्या संख्येने लोकांची गर्दी आहे. त्यांनी एक लाख भाविकांच्या उपस्थितीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र प्रत्यक्षात एक हजारच्या आसपास भाविक विशेषतः वंचितचे कार्यकर्त उपस्थित आहेत.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. त्रिस्तरीय बंदोबस्त असून 450 पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत, मंदिर परिसर सील केला आहे. आंदोलकांना पोलिसांनी शिवाजी चौक येथे अडवले आहे.