म्हैसांग (निखिल देशमुख)- राज्य शासनाने राज्यात देशी दारू दुकानांना उघडण्यास परवानगी दिली.परंतु जेथे सामाजिक धार्मिक,भावना जूळून एकात्मता जोपासण्यात येते अशा धार्मिक स्थळ, मंदिरां मध्ये असलेले देव दैवत यांना दरवाज्याच्या आत बंदिस्त ठेवण्यात येऊन धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार केल्याने सर्वत्र असंतोष व्यक्त होत असतानाच भाजपा च्या वतीने बारुला विभागात भाजपा खासदार तथा केंद्रीय मंत्री संजय धोत्रे व जिल्हाध्यक्ष तथा अकोला पूर्व आमदार रणधीर सावरकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब आपोतीकर यांचे मार्गदर्शना खाली भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तथा जि. प. सदस्य पवन बुटे यांचे नेतृत्वाखाली आपोती बुद्रुक येथील श्रीराम मंदिराचा 5 महिन्यापासून बंद असलेला दरवाजा उघडीत राज्यातील सेना,राष्ट्रवादी व कॉग्रेस महाविकास आघाडी शासनाचे राज्यातील सर्वच मंदिर उघडण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. बारुला विभागातील सर्वच गावांमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आशिष देशमुख, योगेश तराळे, सचिन रामाघरे, निखिल थोरात, सिद्धार्थ आपोतीकर, डिगांबर तराळे, दत्ता अनकुकर, आशिष गाडे, आशिष आपोतीकर, दीपक तराळे, मंगेश तराळे, सुरेश तराळे, दीपक मुकुंदे, विकास मुकुंदे,नरेश तराळे, विजय तराळे,गोपाल तराळे, रवी तराळे,राजेश पाटकर तसेच बारुला विभागातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.