अकोट(देवानंद खिरकर) – गेले कित्येक वर्ष पासून वनविभाग शासन नेहमी अन्याय करीत असून कित्येक वेळा मारहाण करीत आहेत.आदिवासी महिला सुद्धा त्यांचा शिवीगाळ ला बळी पडत आहेत .तसेच जनावरे चारण्या करिता वयोवृध्द गुराखी ना सुद्धा वनविभाग कर्मचारी कडून मारहाणी च्या घटना जास्त घडून राहिल्या आहेत.महिला वर्ग इंधन काळी आणन्यास गेले असता त्यांना सुद्धा हे कर्मचारी अश्लील शिवीगाळ करीत असतात.दिनांक 24 सोमवार रोजी शहापूर धरण नजीक काही आदिवासी लोकांना वनविभाग कर्मचाऱ्यांनी किरकोळ मारहाण केली.हा परिसर त्याचा हद्दीत येत नसून तरी सुद्धा मारहाण कोणत्या कायद्या नुसार केली म्हणून संतप्त आदिवासी लोकांनी आता जस्याच तसे उत्तर देऊ असे ठरविले आहे.या संदर्भात शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच आदिवासी सेनेचे तालुका प्रमुख सुभाष सुरत्ने यांनी आज रोजी उपविभागीय दंड अधिकारी साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांना निवेदन दिले असून आदिवासी समाजावर होणारा अन्याय थांबला नाही तर शिवसेने कडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे यांनी दिला.या वेळी उपस्थित आदिवासी बांधव कमल भास्कर,देवानंद मोरे, विजय भारसाकळे,संजय मावस्कर, आसरूबा नागरगोचे,भावसिंग तळवले,महेंद्र जमोरे,सखाराम जमोरे, रमेश बेलसरे,रमेश नागरगोचे, मनहर कासदेकर,हिरा गवते,विश्राम कासदे, व असंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते.