तेल्हारा(प्रतिनिधी)-दि.26 ऑगस्ट रोजी धुळे येथील विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचा अभाविप शाखा तेल्हारा वतीने स्थानिक संत तुकाराम महाराज चौक येथे निदर्शने करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. अभाविप शाखा तेल्हारा ने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. निवेदनात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नाबाबत तसेच धुळे येथील अब्दुल सत्तार यांच्या गाडीच्या ताफ्याला अडवल्या कारणाने तेथील विध्यार्थ्यांना गुन्हेगारा सारखी अमानुष मारहानी बद्दल निषेध व्यक्त केला आहे. त्यात आणखी काही मागण्या होत्या जसे १) कोरोना महामारीमुळे अंतिम वर्ष वगळता इतर सर्व वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतू विद्यार्थ्यांकडून या सत्राचे परीक्षा शुल्क घेण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यात यावे. २) शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ या वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३०% कपात करण्यात यावी. ३) सरासरी च्या सूत्रामुळे चुकीच्या पध्दतीने लावण्यात आलेल्या निकालांचे पुनर्मूल्यांकन करण्यात यावे. ४) नवीन शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून एकूण शैक्षणिक शुल्काच्या जास्तीत जास्त १५% शुल्क घेऊन प्रवेश देण्यात यावा व उर्वरित शैक्षणिक शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे. ५) स्वायत्त (खाजगी) विद्यापीठांच्या शैक्षणिक शुल्काच्या नियंत्रणासाठी राज्यस्तरीय शुल्क नियंत्रण समिती गठित करण्यात यावी. असे निवेदन आणि निषेध व्यक्त करते वेळी अभाविप चे अ भा वि प नगर अध्यक्ष प्रा. विद्याधर खुमकर ,नगर मंत्री कु.सायली पुंडकर ,विशाल जलमकार,प्रा. स्वप्नील फोकमारे, कुणाल शेळके,विनोद तायडे,अक्षय काळे,विशाल नांदोकार, मनीष डामरे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.