तेल्हारा(प्रतिनिधी)- कोरोनाचा पुन्हा अकोला जिल्ह्यात हाहाकार माजला असून ग्रामीण भागाला आपल्या मगरमिठीत घेण्याचे काम कोरोनाने सुरू केले आहे कोरोना योद्धा असलेले पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने अख्खे पोलीस ठाणेच होम क्वारंटाईन करण्याची वेळ पोलीस विभागावरती येऊन ठेपली.
अकोला जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आता थेट कोरोना हा हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला पोलीस स्टेशन हिवरखेड येथील ४ कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने पोलीस स्टेशन हिवरखेडचे सर्व कामकाज पोलीस स्टेशन तेल्हारा येथुन चालणार आज दिनांक २६ रोजी पोलीस स्टेशन हिवरखेड येथील ०४ कर्मचारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असुन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस स्टेशन हिवरखेड येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कॉरन्टाईन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन हिवरखेड या ठाण्याचा कार्यभार पुढील आदेशापर्यंत पोलीस निरीक्षक, विकास देवरे, पोलीस स्टेशन तेल्हारा यांचेकडे देण्यात आला असुन पोलीस स्टेशन हिवरखेडचे सर्व कामकाज पुढील आदेशापर्यंत पोलीस स्टेशन तेल्हारा येथुनच चालणार आहे.