तेल्हारा(प्रतिनिधी)- गणपती बाप्पा च्या आगमनानंतर आता गौरींचे आगमन झाले आहे. गौरी आगमनाची पारंपारीक गाणी म्हणत गौरींना नवारी साड्या नेसून सजवलं जाते तेल्हारा शहरातील जुने शहर संभाजी चौक येथील टिकार परीवार यांच्या घरी 25 वर्षा पासून महालक्ष्मी बसवतात तेथे मोठ्या भक्तिभावाने महालक्ष्मी मातेचे पुजन करतात त्यांनी एका लहान खोली पासून बसवण्यात सुरुवात केली तसेच या वर्षी साध्या आणि सरळ पद्धतीने शासनाने दिले नियमाचे काटेकोरपणे पालन करत महालक्ष्मी मातेला साकडं घातले की पूर्ण जगात सुरू असलेल्या कोराना महामारी मधून सर्वांना मुक्त कर आणि कोरोना या बिमारी का लवकर नष्ट करण्याची सर्व भक्तांना शक्ती दे. ही टिकार परिवाराकडून महालक्ष्मी मातेला विनंती आहे यावेळेस कोरोना मुळे साध्या पद्धतीने हा सोहळा होत आहे.