पातूर(सुनिल गाडगे)
पातूर तालुक्यातील ग्राम विवरा या गावातील वार्ड नंबर3मध्ये सार्वजनिक रस्त्यावर चिखल आणि घाण साचल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले असून या रस्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे
शनिवारी दुपारी या रस्ता दुरुस्ती करिता या वार्डातील ग्रामस्थांनी या ठिकाणी अर्धा तास ठिय्या आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे
चिखलमय झालेला हा प्रमुख रस्ता आहे या मार्गावर शाळा असल्याने लहान मुलांना या मार्गावरून जावे लागते सतत च्या पावसाने या भागातील नाल्या घाणीने खचाखच भरल्या असून रस्त्यावर घाणपाणी येतं असल्याने आरोग्यासाठी धोका निर्माण झाला आहे त्यामुळे तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी विवरा ग्राम पंचायत चे सदस्य प्रकाश धोत्रे, स्वप्नील रेवाळे, रामभाऊ अहिर, प्रमोद बंड, सुरेश काळपांडे, श्रेयस बुटे, प्रवीण काळपांडे, ज्ञानेश्वर बुटे, जनार्दन बंड, हरिभाऊ काळपांडे यांच्यासह
ग्रामस्थांनी केली आहे