दिल्ली : देशभरात असणारी कोरोनाची परिस्थिती पाहता वाहन चालक आणि मालकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.वाहनांचे फिटनेस,परमिट (सर्व प्रकार),परवाना,नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रांची ३० सप्टेंबर पर्यंत असणारी वैधतेची मुदतवाढ ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र,परवाना,नोंदणी किंवा इतर कागदपत्रांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मंत्रालयाने यापूर्वी ३० मार्च आणि ९ जून रोजी मुदतवाढीची सूचना प्रसिद्ध केली होती.त्यात फिटनेस, परमिट (सर्व प्रकार),परवाना, नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर असल्याचे सांगितले होते.देशभरातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती पाहता, वाहनांचे फिटनेस,परमिट (सर्व प्रकार),परवाना,नोंदणी आदी कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० रोजी संपली आहे किंवा ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणार आहे, त्या सर्वांना ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य वाहन चालक आणि मालकांना मोठा दिलासा मिळावा आहे.