अकोला,दि.24– इयत्ता 10 वी उर्त्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, अकोला येथे शैक्षणीक वर्ष 2020-2021 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे. वर्ग 11 वी (बायफोकल) सायन्स पीसीएम ग्रुप करीता मेकॅनीकल मेन्टेनन्स(A-2) करीता 50 जागा (कॉलेज कोड 141), इलेक्ट्रीकल मेन्टेनन्स(A-1) करीता 50 जागा (कॉलेज कोड 142) राहील. तसेच वर्ग 11 वी एचएससी व्होकेशनल (एमसीव्हीसी) करीता मेकॅनीकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रानिक्स टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी 30 जागाकरीता प्रत्यक्ष प्रवेश सुरु आहे. तर इयत्ता आठवी टेक्नीकल करीता 240 जागा केंद्रीय पध्दतीने प्रवेश देणे सुरु आहे. अधिक माहिती करीता मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजी कॉलेज रोड, जूने अकोट स्टँड, मनकर्णा प्लॉट, अकोला येथे संपर्क साधावा. दुरध्वनी संपर्कासाठी 0724-2433653 तर मोबाईल क्रमांक 9833699235, 9423434758, 9665735927 असा आहे.