मूर्तिजापूर – स्थानिक शहरात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यांना मूर्तिजापूर शहर पोलिसांनी 1:30 च्या दरम्यान धाड टाकून एकलाखाच्या मुद्देमालासह ८ आरोपी अटक केली आहे.
जुना दर्यापूर रोडवरील टिनाच्या टपरीत अवैधरित्या गांजा बाळगून चिल्लर विक्रीसाठी पुड्या भरताना ८ जणांना शहर पोलीसांनी २३ अॉगष्ट रोजी संध्याकाळी १.३० वाजताच्या सुमारास छापा टाकून रंगेहाथ अटक केली त्यांच्या कडून ५ किलो २०० ग्राम गांजासह ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले व ठाणेदार शैलेश शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक इंगळे,महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गावळे कॉन्स्टेबल संजय भरसाकले,
मनीष मालथाने, संतोष धारपवार, नागोराव भांगे, विष्णू ठोरे, स्वप्नील खडे, संजय लहाने यांनी सापळा रचून स्टेशन विभागातील जुन्या दर्यापूर रोड वर टिनाच्या खोलीत अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या रंगेहात पकडले असून आठ आरोपींना पकडून त्याच्या जवळून गांजा 5 किलो किंमत 65000 व 3 मोबाईल 30000 असा एकूण 95000 च्या मुद्देमाल 8 आरोपीं जवळून जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी गांजा विक्री करणारे आरोपी कपिल रतन शितोळे, अनुराग रमाकांत येदवर,सैयाद खान साहेब खान,बाळू लक्ष्मण शिंदे,गोलू ओमप्रकाश झारोडिया, सोनू काशीनाथ साखरे,संतोष बाबाराव तारेकर, मुरलीधर मोहनलाल व्यास याच्याविरुद्ध अवैध गांजा विक्री प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.