अकोट (देवानंद खिरकर)- येत्या 31 ऑगस्टला महाक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर जे ठिय्या आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या निवेदनाच्या प्रती सरकारला व सर्व राजकीय पक्ष प्रमुखांना पाठवलेल्या होत्या आणि त्यामधून वंचित बहुजन आघाडी ने पाठिंबा दिला असून ह.भ.प.अरुण महाराज बुरघाटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वा खाली हे आंदोलन होणार असून वंचित बहुजन आघाडी पक्षाध्यक्ष एडवोकेट श्री बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः आंदोलनाला पंढरपुरला उपस्थित असल्याचे त्यांनीच माहिती दिलेली आहे.पण काही ठिकाणी वृत्तपत्रांमध्ये बॅनर मध्ये श्री माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वारकरी मंडळी चे आंदोलन होणार आहे अशी बातमी आलेली आहे.पण आम्ही आमच्या संघटनेतर्फे जाहीर विनंती करतो की विश्व वारकरी सेना व बाळासाहेब आंबेडकर स्वतः यांच्याकडून अशी अधिकृत कोणतीही बातमी देण्यात आलेली नाही.त्यांच्या चाहत्यांनी वृत्तपत्रांमध्ये बातमी दिली असेल किंवा बॅनर बनवले असेल त्या बॅनरचा व विश्व वारकरी सेनेचा काही संबंध नाही.तरी भाविकांना नम्र विनंती आहे की कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण न करीता ज्यांची इच्छा असेल त्यांनी स्वखर्चाने पंढरपूर येथील आंदोलना मध्ये सहभागी व्हावे. व सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उध्धार हरीच्या नामे या संत वचना नुसार या पवित्र कार्याला सहकार्य करावे.या आंदोलनामध्ये विश्व वारकरी सेना समोर झाल्यामुळे काही मोजकी विघ्नसंतोषी मंडळी ज्यांनी आयुष्यात एकही आंदोलन केले नाही.आणि त्यांची संघटना सुद्धा रजिस्टेशन नाही ती मंडळी विश्व वारकरी सेनेची बदनामी होण्याच्या उद्देशाने संघटनेच्या अपप्रचार करीत आहे. मि त्या मंडळीला विनंती करतो की विश्व वारकरी सेनेची कृपया बदनामी करू नये ही नम्र विनंती. राज्यव्यापी आंदोलन करीत असताना काय त्रास होतो याचा आम्हाला बराचसा अनुभव आहे.आणि म्हणून आपण भविष्यात कधीही आंदोलन करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही खंबीरपणे जाहीर पाठिंबा देऊ आणि विरोध तर मुळीच करणार नाही.कारण आपल्या माणसाला त्रास देणे हे आमच्या रक्तात नाही.