तेल्हारा
(विशाल नांदोकार)-
संस्कार भारती तेल्हारा समितीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमीत्त राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा ४ ते ७ व ८ ते १० अशा दोन वयोगटांमध्ये ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये स्पर्धकाचे १ मिनिटाचे राधा किंवा कृष्ण वेशभूषेचे व्हीडीओ मागविण्यात आले होते. लॉकडाउनच्या काळातही या स्पर्धेला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये एकूण ६५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेचे परिक्षण श्री.ओमप्रकाश उगले सर, महेंद्र देशपांडे, सौ. सुवर्णा भडके, कु. शैलजा राठी यांनी केले. स्पर्धेचा निकाल दि. १८ ऑगस्टला जाहीर करण्यात आला असून यामध्ये ४ ते ७ वयोगटामध्ये कृष्ण वेशभूषा स्पर्धेत नमन प्रतिक काळे (प्रथम), श्री शेखर देशमुख (द्वितीय), कार्तिकेय लक्ष्मीकांत चौरे (तृतीय), ८ ते १० वयोगटामध्ये कृष्ण वेशभूषा स्पर्धेत प्रणव मुरलीधर मंत्री (प्रथम), कु. कृष्णा श्रीराम डेरे (द्वितीय), कु. स्वरा निळकंठ घाटोळ (तृतीय) तर ४ ते ७ वयोगट राधा वेशभूषा स्पर्धेमध्ये कु. तनिष्का भगवान भालेराव (प्रथम), कु. भार्गवी रामेश्वर कुकडे (द्वितीय), कु. आरुषी मुरलीधर मंत्री (तृतीय), कु. परिधी महेश राठी (तृतीय) तसेच ८ ते १० वयोगट राधा वेशभूषा स्पर्धा मध्ये कु. मिताली वसंत गतमने (प्रथम), कु. स्वरमयी राजेश आमले (द्वितीय), कु.पुर्वा राहुल बरींगे व सार्थक राहुल बरींगे (तृतीय) तसेच २ ते ३ वयोगट कृष्ण वेशभूषे मध्ये चि. शंभु निलेश देशमुख (प्रथम), कु. मनयरा अनुप देशमुख (द्वितीय) कु. श्रेया शिवशंकर भारसाकळे (तृतीय) इ. स्पर्धक विजेते ठरले. तसेच सदर स्पर्धेमध्ये साईप्रसाद विनायक दाते, कु. गिरीजा गजानन जवळकार, वृषभ अभिजित मुरारका, कु. आनंदी गणेश गाडगे, कु. मानसी रितेश तिलावत, कु. अन्वी प्रविण बुरघाटे, कु. अक्षरा गोपाल खारोडे यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धकांना बक्षिसदाते प्रा. गिरीश कोरपे,प्रा. स्वप्नील सोळंके, प्रा. गणेश कापसे, प्रा. स्वप्नील फोकमारे, पंकज प्रतापराव देशमुख, वैभव खुपसे, सुमितआप्पा गंभीरे, मदनलालजी राठी यांचे हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जावून बक्षिस वितरण करण्यात आले. या प्रसंगी संस्कार भारती तेल्हारा समितीचे पदाधिकारी व सदस्य चैतन्य नळकांडे (जिल्हाध्यक्ष), सचिन ठोमरे (शहर अध्यक्ष), ह.भ.प. सतिश म्हसाळ (शहर मंत्री), महेंद्र देशपांडे (कोषप्रमुख), शुभम चिकटे (सहकोष), श्याम पाठक सर, ओमप्रकाश उगले सर (वाल विधा), छोटु रुद्रकार, प्रा. स्वप्नील फोकमारे, पंकज देशमुख, सौरभ पाथ्रीकर, सौ मिनाताई बासोडे, कु. शैलजा राठी, कु. भारती खडसे, गजानन जवळकार इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेल्हारा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.