अकोला,दि.22– तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थूंकने व धुम्रपान करण्यामुळे कोविड-19 चा प्रसार व पादुर्भाव होवू शकतो. त्यामुळे अशा पदार्थाचे विक्री करण्याऱ्या दुकाने व पाणटपऱ्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून सकाळी 9 ते सायं. 7 पर्यंत सुरु करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.
शासनाचे सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार त्या तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थास बंदी घातलेली आहे. ते पदार्थ विक्री करण्यास किंवा विक्री कराण्यासाठी ठेवण्यास संपूर्ण बंदी असेल. तसेच अशा प्रकारे बंदी घातलेले पदार्थ विक्री करताना किंवा विक्री करण्यासाठी ठेवल्याचे आढळल्यास संबधिंतावर सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत दंडात्मक व कायदेशिर फौजदारी कारवाई करण्यात येईल. विक्री करणारे दुकानदार व ग्राहकांनी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमालचा वापर करणे वंधनकारक आहे, विक्री करणारे दुकानदार किंवा पानटपरी चालक यांनी सामाजिक अंतराच्या (Sccial Distancing ) नियमांचे पालन करण्यात यावे, अशा ठिकाणी दोन व्यक्ती मध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर राखतील तसेच दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदी करतेवेळी दुकानदाऱ्यांनी दोन ग्राहकांमध्ये सूरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी पाच पेक्षा जास्त लोक एकत्रीत येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसे आढळून न आल्यास याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषधे विभाग, महसूल, पोलीस विभागानी दंडात्मक कारवाई करावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी असून पानटपरी अथवा दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांनी धुम्रपान केल्यास अथवा थुंकल्यास संबंधित दुकानदारावर तसेच ग्राहकांवर सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत दंडात्मक व कायदेशिर कारवाई केली जाईल. पानटपरी किवा दुकानांच्या ठिकाणी फक्त तंबाखुजन्य पदार्थ विक्रीस मुभा राहील. तथापि सदरच्या ठिकाणी असे पदार्थ सेवन करणे अनुज्ञेय राहणार नाही. पानटपरी किंवा दुकानांच्या ठिकाणी व कामगारासाठी असणाऱ्या एकत्र सुविधांचे ठिकाणी व सर्व मानवी संपर्क येण्याच्या ठिकाणी उदा. दरवाजे हेन्डल इत्यादी स्वच्छ व संनिटाईज करण्यात यावीत.
अकोला शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1850 च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक पेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यांना यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशास पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात आलेले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.