तेल्हारा(प्रतिनिधी)- सद्याच्या कोरोनाच्या काळात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज तेल्हारा येथे शांतता समितीची सभा संपन्न झाली.यावेळी आम्हीही कायद्याचे पालन करतो तुम्हीही करा अन आगामी सण उत्सव साजरे करा असे प्रतिपादन अकोला अप्पर पोलीस अधीक्षक वाघुंडे यांनी केले.
आगामी सण उत्सवाच्या काळात नागरिकांनी शांततेत पार पाडावे तसेच कोरोनामुळे अनेक शासनाने नियमावली लागू केल्या असून सण उत्सव शांततेत पार पडावे यासाठी आज तेल्हारा येथे शांतता समितीची सभा स्थानिक माहेश्वरी भवन येथे पार पडली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वाघुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज समितीची सभा संपन्न झाली यावेळी तहसीलदार सुरडकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कोरोना काळात सुद्धा सण उत्सव शांततेत पार पाडले कुठेही अनुचित प्रकार घडला नाही तसेच यानंतर सुद्धा कुठलेही गालबोट न लागता उत्सव साजरे करावे असे आवाहन केले.यावेळी ठाणेदार विकास देवरे,महावितरण चे अभियंता गुप्ता,न प चे अधीक्षक दादाराव इंगळे उपस्थित होते.तसेच शहरातील शांतता समितीचे सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बांधव उपस्थित होते.यावेळी सभेचे संचालन अमित काकड यांनी तर आभार ठाणेदार विकास देवरे यांनी केले.