तेल्हारा (प्रतिनिधी)- स्थानिक सुपिनाथ नगरामध्ये सर्वच भागात भेदभाव न करता नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी या करीता आज २१ ऑगस्ट ला सुपिनाथ नगरातील नागरिकांनी अधिकारी व पदाधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी तेल्हारा नगर परिषद मध्ये ठिय्या आंदोलन केले .
तेल्हारा नगर परिषद च्या वतीने शहरात नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून सुपिनाथ नगरामध्ये काही भागात पाईपलाईन टाकण्यात आली तर काही भागात पाईपलाईन टाकण्यात आली नाही पाईपलाईन टाकताना भेदभाव होत आहे . सदर भागात जुनी पाईपलाईन हि खराब झाल्यामुळे पाण्यामध्ये नालीचे पाणी ,सांडपाणी जात असल्यामुळे व पाण्यामध्ये नारू सदृश्य कृमी आढळून आले आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे ते आम्ही यापूर्वीच नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले आहे.त्यामुळे जुनी पाईप लाईन ही खूपच खराब झाल्यामुळे सुपिनाथ नगरात सर्वच भागात गलोगल्ली मध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी या प्रमुख मागणी साठी सुपिनाथ नगरातील नागरिकांनी तेल्हारा पालिके मध्ये ठिय्या आंदोलन केले व सदर मागणीचे निवेदन मुख्याधिकारी व अध्यक्ष यांना देण्यात आले . मागणी मंजूर न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिनामास अध्यक्ष , मुख्याधिकारी व न प प्रशासन जबाबदार राहणार असा इशारा सुध्दा नागरिकांनी निवेदनातून दिला आहे . निवेदनावर वसंत आमटे , गौतम दामोदर ,कैलास श्रीवास , मंगेश ठाकरे , शिवा राऊत , रवी मालवे, मंगेश हागे , संतोष ठाकरे , ऋषिकेश वरणकार , विठ्ठल पवार ,सचिन सोनटक्के , विठ्ठल चव्हाण , विजय बोदळे , संतोष तायडे ,निशांत परघरमोर ,करण सोनटक्के इत्यादी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत .