तेल्हारा(प्रतिनिधी) – तेल्हारा तालुक्यातील चीतलवाडी गावात किडनी रोगाचे थैमान चालू असुन वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कुठल्याही लोकप्रतिनिधी अन प्रशासनाने दखल घेतली नव्हती प्रसार माध्यमानी याबाबत पाठपुरावा करून ही समस्या उजेडात आणली मात्र किडनी आजाराने मृत्यूचे थैमान घातलेल्या चितलवाडी वासीयांच्या भावना जपून आमदार अमोल मिटकरी यांनी थेट ग्राम चितलवाडी गाठून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
जेमतेम दोन हजार लोकवस्ती असलेल्या लहानशा गावात मागील एक दीड वर्षात 35/40 नागरिकांचा मृत्यू झाला तर या आठवड्यात लागोपाठ पाच जणांचा मृत्यू झाला असल्याने गावात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे येथील गावकऱ्यांनी आमच्या गावाला कीडनी रोगापासुन.वाचवा असा टाहोच फोडला परंतु निवडणूकीत हात जोडून जोगवा मागणारे लोकप्रतिनिधींनी या गावाकडे पाठ फिरवली तर प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहेत अखेर आमदार अमोल मिटकरी यांनी या गावाला भेट देऊन मृतक व गंभीर आजारी यांचे घरी जाऊन भेट दिली
नंतर येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांनी परिस्थितीची जाणीव करून दिली असता आमदारांनी पाणीपुरवठा मंत्री संजय बनसोडे यांचे सोबत भ्रमणध्वनीवरून या गावात किडनी रोगाचे थैमान असुन बरेच मृत्यू झाले असुन हा आजार पिण्याच्या पाण्यामुळे होतअसलयाचे सांगितले असता मंत्री महोदयांनी मला पुर्ण कागदपत्रे सादर करा मी येत्या अधिवेशनात कितीही खर्च आला तरी योजना मंजूर करण्याचे गावकऱ्या समक्ष आश्वासन दिले
आ.मीटकरी यांच्या एका भेटीमुळे आमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला या बाबत गावकऱ्यांनी मिटकरी यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व आभार मानले
या वेळी आमदारा.समवेत सरपंच गजानन.नांदुरकर रा.काॅ.ता.अधयक्ष प्रदीप ढोले डाॅ निलेश वानखडे सोपान कुयटे सलिम भाऊ हर्षल ठोकणे माजी जि.प.सदसय डाॅ मनमोहन व्यास काँग्रेसचे राजीक कुरेशी चीतलवाडी चे विजय इंगळे. मनीष महाले. मा. सरपंच हरीचंद्र देवळे सुधाकर इंगळे मेजर ज्ञानेश्वर बुरकले व ईतर गावकरी होते