अकोला – भारताचे दिवंगत पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सद्भावना दिवस आयोजित करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सद्भावना दिनानिमित्त घ्यावयाची प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधिक्षक मिरा पागोरे, अजय तेलगोटे, नितीन निंबुळकर आदि कर्मचारी उपस्थित होते.