तेल्हारा – ग्रामीण कृषि कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कृषिदूत पूजा गजानन फाटे हिने शेत बांधावर जाऊन शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील प्रमुख किड व याचे व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले.सोयाबिन पिकावरील खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणती पूर्व काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले व कृषी विषयक माहिती दिली.
यावेळी शेतकरी उमेश धनभर, मदन भाऊ सत्रावळे, प्रकाश मामनकार हे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी कृषिदूतांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई, कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे, समुपदेशक व्ही. टी. कपले मॅडम, विषय तज्ञ प्रा. प्रगती टांगळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले