तेल्हारा(प्रतिनिधी)-लॉक डाऊनलोड सर्व शैक्षणिक आस्थापने शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्क फ्रॉम होम पद्धतीने शैक्षणिक कार्य सुरू आहे याच पृष्ठभूमीवर शिर्ला येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी ऋषिकेश डिगांबर दुतोंडे याने ग्रामीण कृषि कार्यानुभव या उपक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील बाभूळगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले
यावर्षी महाराष्ट्रात जवळ जवळ सर्व भागात पावसाने वेळेवर हजेरी लावली त्यामुळे बळीराजा सुखावला आहे शेतातील सोयाबीन कपाशी सध्या चांगलीच बहरलेली आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने पश्चिम भागात कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते अशातच सध्या कपाशीला पाने फुले लागायला सुरुवात होताच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवायला लागला आहे त्यावेळी गुलाबी बोंड आळी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या आणि कशा पद्धतीने त्या उपाययोजना कराव्यात याची माहिती शेतकऱ्यांना दिली त्यावेळी गजानन दुतोंडे डिगांबर दुतोंडे श्रीकृष्ण धुरजळ शहादेव जामनिक योगेश दुतोंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ राम खरडे प्रो सुरज चांदुरकर प्रो वैभव इंगळे आणि प्रो उमेश वानखडे यांचे मार्गदर्शन लाभले