मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रध्वज उलटा फडकविला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे, शनिवारी राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची एकच लगबग असताना, पारद या गावात ग्रामसेविकेने स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात राष्ट्रध्वज उलटा फडकवला.
मात्र, या घटनेची गंभीर दखल अजूनही शासकीय अधिकाऱ्याने किंवा पोलीसांनी घेतली नसून सोशल मिडीयावर घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर गावातील मंडळी या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यास निलंबित करावे अशी मागणी करीत असले
तरी तक्रार दाखल करण्यासाठी कोणत्याही पुढे आले नसल्याची माहिती आहे. ही बाब मूर्तिजापूर येथील पत्रकाराने उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते व बिडीओ ओ. टी. गाठेकर यांच्या लक्षात आणून दिल्याने सदर अधिकाऱ्यानी चौकशी अहवाल मागविल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील पारद या गावात आज सकाळी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात गावातील प्रतिष्ठीत नागरिकांसह ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली, ग्रामपंचायत सरपंच पद सध्या खारीज झाल्याने आता सर्वच जबाबदारी ही ग्रामसेवकावर असल्याने सदर ध्वजारोहण हे ग्रामसेविका मडावी यांच्या हस्ते करण्यात आले होते ,
ध्वज फडकवीत असतांना शासकीय नियमाचे पालन न करता संबंधित ग्रामसेविकेने राष्ट्रध्वज उलटा फडकवून राष्ट्र ध्वजाचा अपमान केला असल्याचे संबधीतांवर राष्ट्रीय ध्वज नियमाच्या संहिते प्रमाणे कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.