तेल्हारा (प्रतिनिधी)-
अकोला ते खंडवा मीटरगेज रेल्वे मार्गाचे काम सध्या ब्रॉडगेज मध्ये रूपांतरित करण्यास सुरू आहे केंद्रीय रेल्वे मंत्रालया अंतर्गत प्रस्थापित लोहमार्ग अकोला,अकोट,हिवरखेड येथून मेळघाट व्याघ्रप्रकल्पातुन खंडवा येथे जोडण्यात येत होता परंतु मेळघाटातील प्राणीमात्रांच्या जीवितास धोका निर्माण होईल व पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये या कारणाने महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मेळघाटातुन रेल्वे मार्ग जोडण्याची राज्यशासनाची परवानगी रद्द केली व याअगोदर वन्यविभागाने सुद्धा याबाबत सदर मार्गाला हरकत दर्शवली होती. म्हणून हा रेल्वेमार्ग मेळघाट मार्गे न नेता तो हिवरखेड वरून तेल्हारा शहराजवळून पुढे संग्रामपूर तालुका ,जळगाव तालुका अशा पद्धतीने तीन तालुक्यांना जोडून निर्माण होऊ शकतो जर हा रेल्वे मार्ग तिन्ही तालुक्यांना जोडला गेला तर भविष्यात याठिकाणी मोठं मोठया उद्योग धंद्याना वाव मिळेल परीणामी बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल व मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचा सुद्धा ऱ्हास होणार नाही यासाठी तेल्हारातील सर्व सुजाण नागरिकांच्या वतीने आज तेल्हारा तहसीलदार यांना व तहसीलदार मार्फत केंद्रीय रेल्वे मंत्री,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री ,तशेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर माजी नगराध्यक्ष दयालसिंग बलोदे,प्रशांत देशमुख,मंगेश घोंगे,पप्पू सोनटक्के,सोनू मलीये,विवेक खारोडे,रामभाऊ फाटकर, ऍड.संदीप देशमुख, विष्णू मल्ल,अनंत सोनमाळे,मनोहर चितलांगे,अजय गावंडे,सचिन थाटे,गजानन गायकवाड,हर्षल ठोकने,जितू राठी,सुनील खारोडे,सुमित कोठे,शुभम सोनोने,प्रमोद कडू,ज्ञानेश्वर आखरे,गजानन जवळकार, नितीन मानकर,पुरुषोत्तम इंगोले, इत्यादी नागरिकांच्या सह्या आहेत. व तेल्हारा येथे रेल्वेलाओ कृती समिती स्थापना करून समितीद्वारे मागच्या कित्येक वर्षांपासून ही मागणी सुरू आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय अमलात आणून त्वरित नव्याने हा रेल्वेमार्ग तेल्हारा शहरालगत न्यावा अशी मागणी जनसामान्यांच्या वतीने होत आहे.