अमरावती – सहा ऑगस्ट रोजी खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला अमरावती येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना नागपुरातील वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज (गुरुवारी) त्यांना श्वास घेताना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार राणा या महामार्गाने मुंबईला जाणार आहेत. त्यांच्या प्रवासाकरिता सुमारे १२ ते १५ तासांचा कालावधी लागणार आहे.
त्यांच्यासोबत त्यांचे पती, आमदार रवी राणा आहेत. नवनीत राणा यांना मुंबईत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. रवी राणा यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, सासू-सासऱ्यांसह कुटुंबातील १२ जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपाचर सुरू आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवरही व्होकार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून मुलांवर घरीच अमरावतीला उपचार सुरू आहेत.