पिंजर (सुनिल गाडगे) दि .१३ बार्शिटाकली येथील संताजी नगर तेलीपुरा भागात असलेल्या रस्त्यावरील एका विहीरीत आज सकाळी ११ वाजता गाय पडली असल्याची माहिती बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तीरुपती राणे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले तो पर्यंत गावक – यांनी स्थानिक पातळीवर प्रयत्न केला असता विहीर सत्तर फुट खोल आणी तीन फुट रुंद असल्याने अशक्य होत होते . तेव्हा अर्ध्या तासातच जिवरक्षक दीपक सदाफळे त्यांचे सहकारी ऋषीकेश तायडे अंकुश सदाफळे ,मयुर सळेदार , सुरज ठाकुर , मयुर कळसकार , राहुल जवके , आशिष गुगळे , हे रेस्क्यु साहीत्य घेऊन आपात्कालीन वाहन घेऊन घटनास्थळी पोहचले तेव्हा विहरीत पडलेली गाय ही खाली अरुंद जागेत फसलेली होती . खाली पाणी आणी मिथेन गॅस असल्याने आत मध्ये जाणे अशक्य होते . परंतु मोठया चिकाटीने व धाडसाने हे रेस्क्यु ऑपरेशन ऑपरेशन यशस्वी केले आणी जिवरक्षक दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात अतीशय दुगंधी व खोल अरुंद विहरीतुन गाईला कुठल्याही प्रकारची ईजा होऊ न देता आज २:४५ वाजता सुखरुप बाहेर काढले . हे विशेष . यावेळी उपस्थित नागरिकांनी सर्व टीमचे आभार मानले . यावेळी अंनत केदारे , सचिन आगाशे , नितेश वाघमारे , श्रीकृष्ण आखरे , अनुप भुजाडे , सुनिल भगत मंगेश कळमकार , राहुल सर्प , शुभम राजुरकर , अरुण अपुने , गजानन गर्दे यांनी सहकार्य केले . पोलीस कर्मचारी जोशी मेजर गीते मेजर होमगार्ड हजर होते , अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे .