अकोट(प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे देशातील गोरगरीब देशोधडीला लागला असुन लोकांना ऊपासमारीची वेळ आली आहे, लॉकडाऊन तत्काळ मागे घेऊन सार्वजनिक परिवहन सेवा सुरु करावी, देशात गेल्या साडेचार महिन्यांपासुन लॉकडाऊन सुरु आहे या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडुन जवळपास १२ कोटी लोकांवर बेरोजगारिची कुऱ्हाड कोसळली आहे, त्यानंतर जुलै पासुन अनलॉकची प्रक्रीया सुरु झाली आहे त्यात काही अटि शर्थीसह दुकाने आणि उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. त्याच बरोबर ग्रामीण भागातील जनतेची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवाही अनेक ठिकाणी बंद आहेत, त्यामुळे लॉकडाऊन उठवून सार्वजनिक परिवह नसेवा तत्काळ सुरु करावी या आंदोलन एड बाळासाहेब आम्बेडकर यांच्या आदेशानुसार व राज्य प्रवक्ता राजेंद्र पातोंडे धैर्वधन पुंडकर जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली व शैलेश धांडे यांच्या नेतृत्वाखाली या मागणीसाठी अकोट बस आगर व्यवस्थापकांना वंचितच्या पदाधिकऱ्यांनी निवेदन देऊन शिवाजी चौकात डफली बजाओ आंदोलन केले, या आंदोलनात काशीराम साबळे सुभाष तेलगोटे मो नुरूजजमा दिनेश घोडेस्वार रामकृष्ण मिसाळ मो जम्मू पटेल सदानंद तेलगोटे निलेश झाडे धीरज सिरसाठ गजानन दौड संजय पुंडकर छत्रुघ्न नितोने अभिमन्यु धांडे सुनीता वानखड़े सुनीता हिरोळे अर्चना वानखड़े मंगला तेलगोटे मंगला वानखड़े जयश्री तेलगोटे लखन इंगळे समीर पठान अक्षय तेलगोटे स्वप्निल वाघ स्वप्निल इंगळे विक्की तेलगोटे गौतम पचांग प्रकाश राऊत प्रल्हाद काळे नितिन वानखड़े दिनेश धांडे विशाल तेलगोटे हिम्मत गावंडे राहुल वानखड़े आकाश गवई संदीप सिरसाठ युवराज मुरकुटे राहुल वानखड़े नंदकिशोर गोरडे सुरज वानखड़े यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडी, महिला आघाडी,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारि उपस्थीत होते अशी माहिती वंचित बहुजन आघाडी सोशल मीडिया चे तालुका प्रमुख नाजीमोद्दीन यांनी कळविळे