तेल्हारा(प्रतिनिधी) – तेल्हारा येथील पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी यांना भाजपा अनुसूचित जमाती आघाडी व भाजयुमो च्या वतीने पंतप्रधान आवास योजनाव शबरी घरकुल योजने अंतर्गत प्रपत्र ड यादीमध्ये नावे समाविष्ट करणेसाठी अकोला जिल्ह्याचे लाडके खासदार व केंद्रीय राज्यमंत्री संजयभाऊ धोत्रे, जिल्हाध्यक्ष रणधीरभाऊ सावरकर,अकोट विधानसभेचे आमदार प्रकाशभाऊ भरसाकळे,अनुसूचित जमाती आघाडी जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ पवार,भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख ,जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे यांचे मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.अकोट विधानसभा हा आदिवासी बहुल भाग असून आदिवासी बांधवांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे.परंतु पंचायत समिती द्वारे केलेल्या घरकुल प्रपत्र ड चे सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात आदिवासी लाभार्थी वंचित राहिले आहेत .त्यामुळे या आदिवासी लाभार्त्यांची नावे तात्काळ या यादीमध्ये समाविष्ट करून गोरगरीब आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी भाजपा अनुसूचित जमाती आघाडी व भाजयुमो अकोला जिल्ह्याचे वतीने करण्यात आली.या निवेदनावर भाजपा अनुसूचित आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश पवार ,भाजयुमो जिल्हासचिव सुमीतआप्पा गंभिरे ,भाजयुमो जिल्हा सहसचिव दिलीप पवार,भाजयुमो सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकार,पंचायत समिती सदस्य संदीप पालीवाल,नगर परिषद सदस्य मंगेश सोळंके,भाजप तेल्हारा शहर सरचिटणीस गजानन गायकवाड,भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले, योगेश डाबेराव यांच्या स्वाक्षऱ्या असून असंख्य पदाधिकारी ची उपस्थिती होती