अकोला – हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार रविवार (दि.16 ऑगस्ट) पर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
काटेपुर्णा प्रकल्पामध्ये बुधवार (दि.12) रोजी सकाळी सात वा. 85 टक्के पाणीसाठा जमा झाला असून दुपारी 12.15 वा. चार गेट मधुन 96.44 घ.मि.प्र.से. याप्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रकल्पा क्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवुन प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविण्यात येईल. याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी/ कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.