अकोला – आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 232 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 198 अहवाल निगेटीव्ह तर 34 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 3101(2611+490) झाली आहे. आज दिवसभरात 19 रुग्ण बरे झाले. तर एका रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. आता 540 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 22355 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 21747, फेरतपासणीचे 169 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 439 नमुने होते. आजपर्यंत एकूण 22291 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 19680 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 3101(2611+490) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 34 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 34 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 16 महिला व 14 पुरुष आहेत. त्यातील रवी नगर व मोठी उमरी येथील पाच जण, जोगळेकर प्लॉट, नवीन भिम नगर व पुनोती येथील तीन जण, वाडेगाव व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित शिवर, सीएस ऑफीस, जूने शहर, अकोट, गंगा नगर, जीएमसी हॉस्टेल व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.तसेच आज सायंकाळी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात दोन महिला व दोन पुरुष आहे. त्यातील सस्ती ता. पातुर येथील तीन जण तर बाजोरिया नगरी येथील एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, काल रात्री प्राप्त झालेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे.
19 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, कोविड केअर सेंटर येथून चार जण, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार जण, ओझोन हॉस्पीटल येथून तीन जण तर ऑयकॉन हॉस्पीटल येथून पाच जणांना अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
एक मयत
दरम्यान काल रात्री एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गंगा नगर, बायपास, जूने शहर अकोला येथील 51 वर्षीय पुरुष असून तो दि. 9 ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
540 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 3101(2611+490) आहे. त्यातील 117 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 2444 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 540 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.