अकोट(देवानंद खिरकर )- दी.8/8/2020 रोजी फिर्यादी पंकज संजय धर्मे यांनी दिलेल्या रिपोट वरुन,त्यांच्या शेतातील खोपडी मध्ये ठेवलेले दोन फवारणी पॉवर स्प्रे पंप कीं.10,000 रुपये कोणितरी अन्यात व्यक्ती ईसमाने चोरुन नेले अशा जबानी रिपोट वरुन अप नं.311/2020 कलम 379 भादवी तसेच दि.8/8/2020 रोजी फिर्यादी शे.ईस्माल शे.ईसाक.रा.कूरेशी पुरा अकोट यांनी दियेल्या रिपोट वरुन त्यांची अकोट ते मोहाळा रोड वरुन मुन्ना शेठ यांचे गीट्टी स्थ्रेशर जवळ ठेवलेलि एक लाल रंगाची हीरो होंडा फैशन प्लस एम एच 30 व्हि 424 कीं.35,000 हजार कोणी तरी अन्यात ईसमाने चोरुन नेली अशा रिपोट वरुन अन्यात व्यक्ती विरुध्द अप.नं.312/2020 कलम 379 गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.पोलिस स्टेशन अकोट ग्रामीण येथे एकच दिवशी दोन्ही चोरीचे गुन्हे दाखल झाल्याने ठाणेदार फड यांनी अरिपो पकडण्या करिता डी.पी.स्काड पथक नेमले होते.तरी पथकाने अवघ्या 5 तासात आरोपिचा शोध घेत दोन्ही चोरीचे गुन्हे उघडकीस आणले व आरोपी पुरेश गिरमु टेकाम रा.ढोलठाणा ता भैसदही ह.मु.बोर्डी यांचे कडून गुन्ह्यात चोरी गेलेले दोन फवारणी पंप जप्त केले आहे.दूसरा आरोपी सुरज उर्फ बजरंग शालीकराम पवार रा.रामापूर याच्या कडून चोरी गेलेली एक लाल रंगाची मोटरसायकल जप्त केली.असा एकुण 45,000 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला असुन दोन्ही आरोपींना गुन्हा दाखल करुन अटक केली व न्यायालया समोर हजर केले असता आरोपीची न्यायालयाने कोठडीत रवानगी केली सदरची कारवाई ठाणेदा फड यांचे मार्गदर्शनाखाली डी पी स्काड पथक नारायण वाडेकर,गजानन भगत,अनिल सीरसाट,प्रवीण गवळी यांनी केली.