अकोला – राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांचा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे.अकोला येथे आज सोमवार (दि.१०) रोजी प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या आवारात, आर.डी.जी.महिला काँलेजसमोर, नेहरु पार्कच्या बाजुला, मूर्तीजापूर रोड अकोला येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ साहित्यीक डॉ. विठ्ठल वाघ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आत्माचे प्रकल्प उपसंचालक अजय कुलकर्णी, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक ताराणीया, अकोला आत्मा समितीचे अध्यक्ष भरत काळमेघ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गीते, तालुका कृषि अधिकारी दिनकर प्रधान तसेच आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेंगोकार, मंगेश झामरे, योगेश देशमुख, सचिन गायगोळ, वरुण दळवी, अर्चना पेठे, निशीका चोपडे यांची उपस्थिती होती.
पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. पाऊस सुरु झाला की, या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रीय अन्न होय. कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही, कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे.त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्या विषयी ओळख व माहिती व्हावी याकरीता कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी शेतकरी गटाच्या माध्यमातून रानभाज्यांचे विक्री सुद्धा करण्यात आली.
रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान असल्यामुळे तसेच संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्ठे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) याची सचित्र माहिती देण्यात आली. याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होईल. ग्राहकांना आरोग्यपुर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे विचार प्रगट करण्यात आले.
यावेळी रानातील मेवा म्हणून अंबाडी,चिवळी,केना,शेवगा, सुरण,करवंद,आघाडा.टरोटा,पिंपळ,भूई आवळा,करटोली, राजगुरा,वाघाटे,फांदीची भाजी,कुंजीर भाजी,चमकुराचे पाने,काटसावर,जिवतीचे फुलं व इतर प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी रास्त भावात उपलब्ध होती.
रानभाज्याची माहिती :
टाकळा
रानभाजी : टाकळा
शास्त्रीय नाव : Cassia Tora
इंग्र्रजी लरप : Foetid Cassia
स्थानिक नाव :तरोटा, तरवटा
कुळ : Caesainaceae
आढळ : टाकळा हे तण पडीक ओसाड सर्वत्र आढळलेले असते. टाकळा ही वनस्पती उष्ण कटिबंधातील सर्व देशात आढळते.
औषधी गुणधर्म :
1. टाकळयाच्या पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो.
2. टाकळा सर्व प्रकाराच्या त्वचारोगात देतात.
3. बिया लिंबाच्या रसातून वापरण्याचा प्रघात आहे.
4. पानांचा काढा दातांच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर निर्देशित करतात.
5. पित्त्ज, हृदयविकार, श्वास, खोकला यात पानांचा रस मधातून देतात.
6. त्वचा जाड झालेली असल्यास याचा विशेष उपयोग करतात.
7. पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष् कमी होण्यास मदत होते.
दिंडा
रानभाजी : दिंडा
शास्त्रीय नाव : ढोलसमुद्रिका
कुळ : Leeaceae
आढळ : ही प्रजात पश्चिम घाट कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागातील जंगलात आढळते.
औषधी गुणधर्म –
1. व्रणरोपक म्हणून दिंडा ही वनस्पती प्रसिध्द आहे.
2. औषधात दिंडयाचे मुळ वापरतात.
3. वनस्पतीत ग्राही, वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन हे इतर औषधी गुणधर्म आहेत.
4. कंदाचा लेप नायटयावरही प्रसिध्द आहे.
पिंपळ
रानभाजी : पिंपळ शास्त्रीय नाव : Ficus religiosa
इंग्रजी नाव : Piple
स्थानिक नाव : अश्वत्थ, पिप्पल बोधिम
कुळ : Moraceae
आढळ : हे वृक्ष मध्य भारत, पश्चिम बंगाल व हिमालयाच्या पायथ्याशी आढळतात.
औष्धी गुणधर्म :
1. पिंपळाची साल, सालीची राख, कोवळी व सुखी पाने, फळे व बिया औष्धात वापरतात.
2. पिंपळाची साल रक्तसंग्राही व पौष्टिक आहे.
3. फळे पाच व रक्तशुध्दी करणारी आहेत.
4. पिकलेले पान विडयाच्या पानातुन काविळीत देतात.
5. मुळाची साल मधात घासून मुलांच्या मुखरोगात वव्रणावर लावतात. पित्तकोपातही पिंपळ उपयुक्त आहे.
6. कोवळी अंतर्साल अस्थिभ्ंगावर उपयोगी आहे.
सुरण
शास्त्रीय नाव : Amorphallus paeoniifolius
कुळ : अरेएसी
उपयुक्त भाग : कंद, मूळ पाने इ
कालावधी : बहुवार्षिक (कंद)
औषधी गुणधर्म :
1. सुरणात अ, ब, क ही जीवनसत्वे आहेत.
2. कंद लोणच्याच्या स्वरुपात वायू नाशी समजला जातो.
3. आतडयांच्या रोगात सूरणाची भाजी गुणकारी आहे.
4. दमा, मूळव्याध, पोटदुखी, हस्तीरोग व रक्तविकारांवर भाजी उपयोगी आहे.
पानांचा ओवा
रानभाजी : पानाचा ओवा
शास्त्रीय नाव : Plectranthus amboinicus
इंग्रजी नाव : Aromatic Coleus
आढळ : वनस्पतींचे नाव पानांचा ओवा असे आहे कारण पानांच्या आव्यासारखा वास येतो.वनस्पतीची लागवड बागेत करतात
औषधी गुणधर्म :
1. पानांचा औषधात वापर करतात पेयजलांना सुवासिक वास येण्यासाठी पानांचा उपयोग करतात.
2. गुरांसाठी औषध म्हणून वापरतात.
3. पोटदुखी, अपचन, कुपचन, पोटशुळ यामध्ये एखादे पान दिल्यास गुण येतो.
4. नेत्राभिष्यन्दात पापण्यावर पानांचा रस लावतात किटकदंशावर गुणकारी दमा, जुनाट खोकला, फेपरे इ. संकोचप्रधान रोगात उपयोगी.
बांबु
रानभाजी : बांबू
शास्त्रीय नाव : Bambusa Arundinacea
स्थानिक नाव : कासेट काष्ठी कळक
कुळ : Poaceae
इंग्रजी नाव : SpinyThorny Bamboo
आढळ : ही वनस्पती गवताच्या कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे ही वनस्पती प्रामुख्याने कोकण व पश्चिम घाट पश्चिम घाट परिसरात तसेच खानदेश व विदर्भात आढळते
औषधी गुणधर्म :
1 बांबुचे मुळ, पाने, बिया कोवळया खोडाचे कोंब व वंशलोचन औषधात वापरतात.
2. बांबूच्या खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन थंड, पौष्टिक आणि कामोत्तेजक म्हणून वापरतात.
3. बांबूच्या मुळाचा रस भाववर्धक आहे. त्याची साल पुरळ बरे होण्यासाठी उपयुक्त आहे.
4. कोवळया कोंबापासून तयार केलेले लोणचे व कढी अपचनात उपयुक्त आहे.
5. कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात.
6. कोवळी पाने दालचिनी सोबत वाटून कफातून रक्त पडत असल्यास देतात बांबूच्या बिया कामोत्तेजक व संसर्गरक्षक म्हणूनही उपयोगी आहेत.
7. बांबूचे बी स्थुलांसाठी आणि मधूमेहिंच्या आहारात उपयुक्त आहे.
कपाळफोडी
रानभाजी : कपाळफोडी
कुळ : सॅपिनडिएसी
उपयुक्त भाग पाने
कालावधी : वार्षिक (वेलवर्गीय फुले : ऑक्टोंबर-डिसेंबर)
आष्धी गुणधर्म :
1. केशसंवर्धनासाठी वापरतात.
2. कानदुखीत व कानफुटीत कानात पू झाल्यास पानांचा रस कानात घालतात.
3. मासिक पाळी नियमिती होत नसलयास अंगावरुन कमी जात असल्यास
4. जुनाट खोकला, छाती भरणे या विकारात उपयुक्त आमवातात मुळांचा काढा करतात
5. पान एरंडेल तेलात वाटून सुजलेल्या सांध्यावर बांधतात.
मायाळु
राजभाजी : मायाळू असून त्वचारोग, आमांश व्रणयावर उपयोगी.
शास्त्रीय नाव :Basella alba
इंग्रजी नाव :Ma;bar Night Shade Indian Spinach
स्थानिक नाव : बेलबोंडी
कुळ : Basellaceae
आढळ : मायाळू या बहुवर्षाय वेलाची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत सर्वत्र लागवड करतात.
औषधी गुणधर्म :
1. मायाळू ही औषधी वनस्पती असून ती शीतल व स्नेहन आहे.
2. ही वनस्पती तुरट, गोडसर, स्निग्ध, निद्राकार, कामोत्तेजक चरबीकारक, विरेचक व भूकवर्धक आहे.
3. मायाळू कफकारक, मादक व पौष्टिक आहे.
केना
राजभाजी : केना
स्थानिक नाव : Commelina benghalensis
कुळ : कॉमिलीनिएसी
उपयुक्त भाग : पाने
कालावधी : वार्षिक
औषधी गुणधर्म :
1. या भाजीमुळे पचनक्रिया होऊन पोट साफ होते.
2. त्वचाविकार , सूज इ. विकार कमी होतात.
3. भाजीमुळे लघवी साफ होण्यास मदत होते.
अळु
रानभाजी : अळू
शास्त्रीय नाव :Colocasia esculenta
कुळ : Araceae
स्थानिक नावे : अरबी
1. अळू कंदवर्गीय वनस्पती आहे याच्या दोन जाती आहेत. एक हिरवट पांढरी व दुसरी काळी
औषधी गुणधर्मै :
1. अळूची काळी जात औषधात वापरतात.
2. पानांचे देठ मिठाबरोबर वाटून सुजलेल्या गाठी बसण्यास लेप करतात.
3. अळूचा रस जखमेवर चोळल्याने रक्त वाहणे बंद होऊन जखमही लवकर भरुन येते.
शेवगा
शास्त्रीय नाव : Moringa oleifera
कुळ : मारिंगेएसी
उपयुक्त भाग : पाने, शेंगा, फुले,मूळ.
कालावधी : वार्षिक (वृक्ष) बहार- जानेवारी ते एप्रिल
औषधी गुणधर्म :
1. यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम, संत्रयाच्या सहापट क जीवनवसत्व व केळयाच्या तीनपट पोटॅशियम तसेच लोह व प्रथिनेही असतात.
2. यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असून मधुमेह व उच्च रक्तदाबावर उपयुक्त.
3. मूळाच्या सालीचा रस कानदुखीत वापरतात. पानांच्या भाजीमुळे सूज, जंत गळू हे आजार बरे होतात. कृमिनाशक म्हणून उपयुक्त
4. शारीरिक व मानसिक थकवा, जडपणा या भाजीने कमी होतो.
भुईआवळी
रानभाजी : भुईआवळी
शास्त्रीय नाव : Phyllanthus amarus
कुळ : Euphorbiaceae
आढळ : भुईआवळी पावसाळयात सर्वत्र सर्व प्रकारच्या हवामानात आढळते.
औषधी गुणधर्म :
1. कावीळ झाल्यास भुईआवळी वाटून दुधाबरोबर सकाळ संध्याकाळ देतात.
2. भुई आवळीने लघविचे प्रमाण वाढते. व दाह कमी होतो.
3. भुई आवळीचा वापर यकृतवृध्दी व प्लीहावृध्दी कमी करण्यास करतात.
पाथरी
रानभाजी : पाथरी
शास्त्रीय नाव : Launea procumbens
कुळ : ॲस्टरोएसी
उपयुक्त भाग : पाने
कालावधी : वर्षभर (फुले : नोव्हेंबर-डिसेंबर)
औषधी गुणधर्म :
1. पाथरीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दुध वाढते.
2. चारा म्हणून वापरल्यास जनावरांचे दुध वाढते.
3. हे चाटण सुक्या खोकल्यास उपयुक्त आहे.
4. भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो.
5. कावीळ व यकृत विकारात ही भाजी उपयुक्त आहे.
आंबुशी
रानभाजी : आंबुशी
शास्त्रीय नाव : Oxalis Corniculata
स्थानिक नाव : आंबुटी, आंबाती आंबटी, भुईसर्पटी ई.
कुळ : Indian Sorrel
आढळ : आंबुशी हे प्रामुख्याने बागेत जागी तसेच कुडयातून वाढणारे तण आहे. ही भाजी महाराष्ट्रात सर्वत्र आढळते.
औषधी गुणधर्म :
1. अंबाशी गुणाने रुक्ष व उष्ण आहे. पचनास हलकी असून चांगली भूकवर्धक आहे.
2. आंबुशीच्या अंगरसाने धमन्याचे संकोचन होऊन रक्तस्त्राव बंद होतो.
3. चामखिळ आणि नेत्रपटलाच्या अपारदर्शकतेत पानांचा रस बाहय उपाय म्हणून वापरतात.
4. ताज्या पानांची कढी उपचाच्या रोग्यांना पाचक आहे.
5. आंबुशी वाटुन सुजेवर बांधल्यास दाह कमी होऊन सूज उतरते.
6. धोतऱ्याचे विष चढल्यास आंबुशीचा रस उतार म्हणून देतात.
7. कफ, वात आणि पूलत्याध यात आंबुशी गुणकारी आहे.
गुळवेल
शास्त्रीय नाव : Tinospora cordifolia
स्थानिक नारवे : गरुडवेल, अमृतवेल, अमृतवल्ली ई.
इंग्रजी नाव :Heart Leaved Munseed
कुळ : Menispermacea
आढळ : ही बहुवर्षायु वेल महाराष्ट्रात सर्वत्र आढळते.
औषधी गुणधर्म :
1. गुळवेल महत्वाची औषधी वनस्पती असून तिची खोडे अनेक रोगांवरील औषधात वापरतात.
2. गुळवेल कटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिकज्वरनाशक गुणधर्माची आहे.
3. ही वनस्पती ताप, तहान,जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे.
4. गुळवेलीचे सत्व व काढा वापरतात.
5. ती रक्त सुधारक असून पित्तवृध्दीच्या काविळीत गुणकारी त्वचारोगात उपयोगी आहे.
6. मधुमेह, वारंवार मुत्रवेग, कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे.
कुडा
शास्त्रीय नाव : Holarrhena pubescens
इंग्रजी नाव : Konesi Barj Tree
स्थानिक नाव : पांढरा कुडा
कुळ : Apocynaceae
आढळ : ही वनस्पती महाराष्ट्रात बहुतेक सर्व ठिकाणी पर्णझडी जगलात आढळतात.
औषधी गुणधर्म :
1. पांढरा कुडा ही महत्वाची औषधी वनस्पती असून औषधात मुळाची साल व बिया वापरतात.
2. कुष्ठरोग, त्वचारोग यात गुणकारी आहे. धावरे, रक्तस्त्रावयुक्त मुळव्याध, थकवा यामध्ये कुडयाच्या बिया उपयुक्त ओत.
3. बियांचे चुर्ण चिमूटभ् र रोज खाल्यास अन्न जिरते, पोटात वायु धरत नाही.
4. अतिसार, ताप, काविळ, कुष्ठरोग, कफ, त्वचाविकार, पित्तकोष यात साल गुणकारी आहे.
5. पाने स्तंभक, दुग्धवर्धक व शक्तिवर्धक असून स्नायुंचे दुखणे कमी होतात.
करटोली
शास्त्रीय नाव : Momordica dioica
कुळ :Cucurbitaceae
स्थानिक नाव : काटोली, कटुर्ल, रानकारली, कर्कोटकी इ.
उपयोग :
1. डोकेदुखीत पानांचा अंगरज, मिरी, रक्तचंदन आणि व नारळाचा रस एकत्र करुन चाळतात.
2. मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारांत कंदाचा वापर करतात.
3. करटोलीची पाने ताप, दमा, दाह, उचकी, मुळव्याध यात गुणकारी आहेत.
4. भाजी रुचकर असुन पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.
5. मधुमेहामध्ये या भाजीचे नियमीत सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
6. मुळव्याध मधिल वरचेवर रक्तस्त्राव वेदना ठणका यामध्ये भाजी अत्यंत हितकारक आहे.