(बेळगाव मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतडा हटवल्या प्रकरनी)
तेल्हारा :- कर्नाटक मधील बेळगाव जिल्ह्यात मनगुत्ती गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक मधील भाजप सरकारच्या आदेशावरून रातोरात हटविण्यात आल्याने शिवभक्तांन मध्ये संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा तेल्हारा शहरातील जगतगुरू संत तुकाराम चौक येथे तेल्हारा तालुका व शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध करून रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी शिवसेना युवा सेनेच्या वतीने कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेना शहर प्रमुख विक्रात शिंदे , माजी शहर प्रमुख पप्पूसेठ सोनटक्के ,युवा सेना जिल्हा प्रवक्ते प्रा. सचिन थाटे , माजी नगसेवक रामभाऊ फाटकर शिवसेना उपतालुका प्रमुख अजय गावंडे , गोपाल विखे , युवा सेना तालुका प्रमुख मुन्ना पाथरीकर ,शहर प्रमुख राम वाकोडे , सुधाकर गावंडे , दिलीप पिवाल , स्वनिल सुरे, संतोष राठी , संतोष साबळे ,अक्षय गावंडे , अंकुश आठवले ,श्याम जिंदे ,प्रज्वल मोहोड , सागर मते,गजानन मोरखडे , नितीन मानकर , गॊपाल जायले, अमर ठाकूर, रवी येवले , मंगेश हागे , गजानन महल्ले , मनोज गवळी , गौतम दामोदर इत्यादी शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता .