बोरगाव मंजू – राष्ट्रीय महामार्गावरून अमरावती कडून अकोल्याकडे एका मालवाहू पिकप गाडीत निर्दयतेने कोंबून जनावरे कत्तलीसाठी वाहुन नेत असताना बोरगाव मंजू पोलिसांनी नाकेबंदी करून माल वाहू दोन पिकप पकडुन २३ जनावरांना रविवारी ९ ऑगस्ट रोजी पोलिसांनी जीवदान दिले, दरम्यान चार जणांना ताब्यात घेऊन विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले
पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार रविवारी गस्तीवर असलेल्या पोलिसांना माहिती मिळाली, अमरावती कडून दोन मालवाहू पिकप मधुन अवैधरित्या कोंबून निर्दयतेने गुरे वाहून नेत आहे वरून बोरगाव मंजू बस थांब्यावर ठाणेदार हरीश गवळी सह पोलिसांनी बस थांब्यावर सदर नाकेबंदी करून अमरावती कडून अकोला कडे जाणारा मालवाहू पिकप गाडी क्रंमाक एम.एच.३० बी.डी.२४६४ व पिकप गाडी क्रंमाक एम एच ३० बी.डी.२५१७ या दोन मालवाहू पिकप दोन्ही वाहने थांबवले अधिक चौकशी सह तपासणी केली असता सदर वाहनात अवैधरित्या निर्दयतेने कोंबून २3 जनावरे मिळून आले ,दरम्यान सदर वाहनातील चार जणांना ताब्यात घेतले असता शेख रफीक शेख रजाक, शेख समीर शेख जमील, शेख वकील शेख शकील,शेख फारुख शेख मतीन असे आरोपींचे नावे निष्पन्न झाली दरम्यान सदर जनावरे अवैधरित्या विना परवाना निर्दयतेने वाहून अवैधरित्या कत्तलीसाठी जात असल्याचे पोलीस चौकशी व तपासा अती निष्पन्न झाले, आरोपीकडून मालवाहू दोन पिकप सह २3 जणावरे असा एकूण.तेरा लाख साठ हजार रुपयाचा ऐवज जप्त करून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायदा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पुढील ठाणेदार हरिश गवळी सह सह पोलीस करीत आहेत.