बोर्डी – अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे सालाबाद प्रमाणे असलेली नागास्वामी महाराज यात्रा महोस्तव यावर्षी कोविड – 19 कोरोना या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी मा.जिल्हाधिकारी अकोला यांचे आदेशानूसार यावर्षी बोर्डी येथिल नागास्वामि महाराजांचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.दरवर्षी खुप मोठ्या संख्येने भाविक बोर्डीमध्ये यात्रे करिता दाखल होतात.त्या अनुषंगाने यावर्षीचा नागास्वामी महाराज यात्रा महोस्तव हा रद्द करण्यात आला आहे.तरी विनापरवानगी बोर्डी गावात किवा नागास्वामी मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.करिता कोणीही बोर्डीला नागास्वामी महाराज मंदिरात दर्शनासाठी येऊ नये.शासनाने दिलेले नियम पाळुन अप्रिय कारवाई टाळावी.व प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन ग्रामीण पोलिस स्टेशन अकोट व नागास्वामी महाराज मंदिर बोर्डी समितीच्या वतिने करण्यात आले आहे.