अकोट – अखिल भारतीय आदीवासी विकास परिषद नई दिल्ली शाखा आकोला जिल्हाध्यक्ष मा.श्री.अजाबरावजी ऊईके यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला.ह्या वेळी शबरी माता चे हार फुलानी पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.माजी जि.प.सदस्य अंबिरलाला मोरे, प्रमुख पाहुणे म्हणुन अ,भा,आ,वि,परीषदचे आकोला जिल्हाकार्यध्यक्ष मा डिगांबर सोळंके(वस्ताद) लाभले होते.तर मार्गदर्शक म्हणून प,विदर्भ भिल संघटनेचे अध्यक्ष मा,देवीदास भास्कर गुरूजी यांनी केले.या वेळी अखिल भारतीय आदीवासी विकास युवा परिषद नई दिल्ली चे महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री.लकी जादव यांनी आकोला युवा परिषद जिल्हाध्यक्ष पदी राजेद्र अंबिरलाला मोरे (जि.प.सदस्य) यांची एका पत्राद्वारे नियुक्ति केली.व मा.श्रीकांत राजेशजी खोने दानापूर माजी, जि ,प, सदस्य यांची आकोला युवा परिषद चे कार्यध्यक्ष पदी निवड करण्यात आली व मा.युवा जोश विजय कुमार सोळंके,बोचरा यांची उपजिल्हाध्यक्ष म्हणुन निवड करुन नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बहूसंख्य आदीवासी बांधव उपस्थित होते.मा.भास्कर गुरूजीनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.प्रमुख पाहूणे म्हणून मा जिल्हाकार्यध्यक्ष डीगiबर सोळंके (वस्ताद ) यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाला मोलाचे समाज मार्ग दाखवले,व नविन पद अधिकारी ना मार्गदर्शन केले.
या वेळी देवानंद मोरे,पंजाब पालवे, रमेश सुरत्ने,मेघनाथ सुरत्ने,रामदास भास्कर,सुरज नाथे,राजपाल पालवे, शंकर मोरे, राजु राडौर,युवराज मंगलशिग मालवे,सत्य विजय डाबेराव,एकनाथ गांवडे, शामलाल काजदेकर,२ाजु वाकेला,किर्ती पलवान ठाकर,व बहूसंख्य समाजाने हजेरी लाहून आदीवासी गौरव दिवस साजरा केला.