तेल्हारा – सन – 2019-2020 साली मुंगाच्या व उडिदाच्या पिकांवर अतीशय जास्त प्रमाणे मर व इतर प्रकारचे ( बेडक्या रोग ) रोग निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याचे आतोनात नुकसान होत आहे . सद्यस्थिती मुंगावर मागील जुलै 2020 पासुन रोग आलेला असनु शेतातील पिक खराब करीत आहे . तसेच सद्यपरीस्थिती अशी आहे की , या रोगाचा प्रादुर्भाव उडिदा वर सुध्दा होत आहे . त्यामुळे किमान शासनाने मुंगाच्या पीकाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचे सर्व्हे करुन त्वरीत नुकसान भरपाई करुन देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी आज तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आधीच कोरोना चा प्रादुर्भाव संपुर्ण भारतात सुरुच आहे . शेतकरी हया सर्व आजारांमुळे हैरान व परेशान झालेला आहे.त्यात आता हा मर व इतर प्रकारचे ( बेडक्या रोग ) नविन रोग शेतकऱ्यांना हलावुन टाकले आहे . त्यामुळे शेतकाऱ्यांचे जिवत धोक्यात आलेला असुन त्यांची मोठयाप्रमाणत आर्थिक कोंडी निर्माण झालेली आहे . तरी आपण तात्काळ सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन आम्हा शेतकऱ्यांना न्याय देण्याचे कार्यवाही करावी. आज दि. ७ ऑगस्ट रोजी संग्रामभैया गावंडे (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) व शिव भाऊ मोहोड (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांच्या मार्गदर्शनाखाली मा . तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी हर्षल ठोकणे (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ) ,विशाल मालिये (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ), अविनाश विखे(शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस) अक्षय इंगळे,आकाश खराटे,शुभम वानखडे,अंकित मालिये,गजानन गोठकडे,एजाज शाह, अनिल अवचार, संदीप सोळंके राजा कुरेशी,दीपक वळोदे,लकी नानकशाही,जुबेर खान, यश अवचार,व समस्त कार्यकर्ते उपस्तीत होते.