पातूर (सुनिल गाडगे) :- पातूर येथील साईबाबा विद्यालय परिसरात राहणारे वसंता दूरळकर यांच्या घरात साप असल्याची माहिती पत्रकार निशांत गवई यांना मिळताच त्यांनी सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे यांना संपर्क केला असता सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे,सर्पमित्र संजय बंड, सर्पमित्र प्रमोद कढोणे यांनी पोहचून पाहणी केली असता सदर घरात कोब्रा जातीचा विषारी साप असल्याचे निदर्शनास आले.सर्पमित्रांनी या सापाला पकडून त्याच्या नैसर्गिक आवासात सुखरूप सोडून दिले, व यावेळी उपस्थित नागरिकांना सापबाबत माहिती देऊन साप न मारण्याबाबत जनजागृती करून नागरिकांना भयमुक्त केले.
गाव माझा न्यूज चे प्रतिनिधी असलेले व सर्पमित्र असलेले स्वप्निल सुरवाडे हे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सर्पमित्र म्हणून सेवा देत आहेत.आजपर्यंत त्यांनी दोन ते तीन हजार सापांना वाचविले असून सर्पमित्र म्हणून तालुक्यात नावलौकिक मिळविले आहे.
पातूर शहरासह तालुक्यात कुठेही साप निघाला की पहिली आठवण येते ती सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे यांची,सुरवाडे यांना साप असल्याचा कॉल येताच कितीही महत्वाच्या कामात असू दे हा अवलिया धावून जातो व तेथे जाऊन साप पकडून नागरिकांना माहिती देऊन भयमुक्त करण्याचे काम करतात तेही कुठलेच शुल्क न घेता निष्काम सेवा देण्याचे काम सर्पमित्र तथा गाव माझा न्यूजचे प्रतिनिधी स्वप्निल सुरवाडे गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. त्यांच्या कार्यामुळे तालुक्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे व सामान्य माणसाच्या मनात एक वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले आहे. साप असो अथवा कुठलेही जंगली प्राणी असो हा सर्पमित्र त्याला वाचविण्यासाठी तत्पर असतो.निसर्गसृष्टी व प्राणीदया मनात असलेल्या अशा अवलीयास तालुक्यातील जनतेकडून नेहमीच प्रेम व मनाचा दर्जा मिळते.