बोर्डी (देवानंद खिरकर)- अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरातील यावर्षी मुंगपिक हे चांगले बहरत असतांना अचानक मुंगाची पाने पिवळी पडून पिक सुकत चालले आहे.अचानक बहरलेले पिक बेंडक्या या रोगामुळे नष्ट होवुन हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिसकावत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.मुंग पिकाच्या झालेल्या नुकसानिमुळे शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदील झाला आहे.यावर्षी कोरोना व्हायरसचा पादुर्भाव व लॉकडाऊन यामुळे अगोदरच शेतकरी संकटात असतांना मुंगावर आलेल्या या बेंडक्या रोगामुळे पिक पुर्णपणे नष्ट होत आहे.लागवड जोपासणीसाठी केलेला खर्चसुध्दा मातीत गेला आहे.त्यामूळे शेतकर्याची दयनीय अवस्था झाली आहे.तरी सरकारने त्वरित पंचनामे करुन मुंग उत्पादक शेतकर्याला आर्थीक मदत द्यावी.अशी मागणी बोर्डी परिसरातील शेतकरी वर्गा कडून होत आहे.
मी माझ्या शेतात 1 एक्कर मुंग पिकाची लागवड केली आहे,पिक बहरत असतांना अचानक पने पाने पिवळी पडून पिळ सुकत चालले आहे.मुंगावर बेंडक्या रोगाची लागण होऊन पिक सुकत आहे.सरकारने त्वरित पंचनामे करुन आम्हाला मदत द्यावी.
-महेश ढोकणे शेतकरी बोर्डी.
हातातोंडाशी आलेला मुंग पिकाचा घास बेंडक्या रोगाने हिसकावला आहे,यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
-बाबाराव आप्पा बेगडे शेतकरी बोर्डी.