पातूर (सुनिल गाडगे):- वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षण करण्यासाठी पातूर शहर भाजप महिला आघाडी च्या वतीने येथील हिंदू स्मशानभूमीत विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण केले.
महिला आघाडीच्या वतीने सौ. वैशाली निकम, जेष्ठ कार्यकर्त्या सौ.मीराबाई तायडे, भारतीताई गाडगे,नगरसेवक तुळसाबाई गाडगे, सौ.देवकाबाई खंडारे, सौ. रेखाताई गोतरकर,सौ. शितल हिरळकरआदींनी पुढाकार घेऊन एक हजार वृक्ष लागवड चा संकल्प करीत पातूर शहरात हा उपक्रम पार पाडला