मुर्तिजापुर (सुमित सोनोने):- शहरातील लाॅकडाऊन च्या सुरूवाती पासुन दुर्लक्ष असलेल्या महाराजा चौक ते रामाश्रय चौक पर्यंत रास्तेचा अर्धवटकाम पुर्ण करण्याची मागणी विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहीते यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मो शाबोद्दीन यांच्या मार्गदर्शनात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,महाराजा चौक ते रामाश्रय चौक पर्यंत चार महिने अगोदर पासून रस्ता खोदून त्यावर फक्त मुरूम टाकण्यात आलेला आहे. याचा त्रास सामान्य नागरिकांना बरोबरच व्यावसायिकांनाही होत आहे. एक तर करुणा चा प्रादुर्भाव मुळे सुरु असलेली संचारबंदी त्यामुळे व्यावसायिकांचे मरण होत आहे. त्यातच पावसाळा सुरू झाला असून त्या रस्त्यावर टाकलेल्या मुरमा मुळे रस्त्यावर चिखलाने आपले साम्राज्य निर्माण केले. सध्या पावसाळा सुरू आहे परंतु काम सुरू झाले तेव्हापासून आजपावेतो हे काम पूर्णत्वास गेले असते परंतु नगरपरिषदेच्या कामचुकार व दुर्लक्ष पद्धतीमुळे काम रखडले आहे. सुरुवातीला टाकल्यामुळे गाडीचे टायर फुटणे मुरूम उडून जखमा होणे अपघात अशा विविध घटनांना सामान्य नागरिकांना सामोरे जावे लागले होते.आता पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये या दोन्ही त्रासांमध्ये वाढ झालेली आहे. विशेष बाब म्हणजे मूर्तीजापूर शहरातील जुन्या वस्तीला जोडणारा एकमेव रस्ता असल्याने या रस्त्याने नगरपरिषदेचे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी नोकरदार वर्ग व्यावसायिक इतर मजूर वर्ग मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याने येणे जाणे आहे. या अगोदर बरेच निवेदन देणे झालेत परंतु त्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही त्यातच कोरोना च्या काळात सुरु परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने याबाबत कुठल्याही स्वरूपाचे पाऊल उचलले नाही.किंवा कारवाई केली नाही.याबाबत ते शांत का आहेत याबाबत सामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे.या रस्त्याच्या अशा दुरावस्था मुळे बऱ्याच जणांना मणक्याचे त्रास सुद्धा सुरू झालेले आहे तरी आमच्या या अर्जावर जातीने लक्ष देऊन त्वरित बात करा महाराजा चौक ते रामाश्रय चौक पर्यंतच्या रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत पूर्ण करावे अन्यथा जी परिस्थिती निर्माण होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका व स्थानिक प्रशासनाची राहील या संदर्भात त्वरित तोडगा काढण्यात यावे अशी मागणी मो शाबोद्दीन,ऊर्मिला डाबेराव, तौसिफ खान,नितीन गायकवाड,सचिन तराळ,रोहित सोळंके,अमोल तातुरकर,दिपक खंडारे,गौतम उमाळे यांच्याकडून करण्यात आली.