अकोट – दि ४ ऑगस्ट रोजी संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन कार्य क्षेञ संपूर्ण भारत संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कदम यांच्या सुचनेनुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर निवेदन देण्यात आले. संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन (कार्यक्षेत्र संपूर्ण भारत) तालुकाध्यक्ष उमेश जनार्दन इंगळे यांनी अकोट येथील तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अकोट तालुक्यातील दिपक सावरकर,मंगेश पटके,विशाल तायडे, मंगेश खंडारे, अरुण इंगळे, बंडुपंत धनवटे, नरेंद्र इंगळे, सुरेश चंदन, गोविंद इंगळे, आशिष गवई, सचिन लांडगे, राम इंगळे, बंटी वाडेकर, तुषार ठाकरे, विशाल देऊळकर व निलेश शेगोकार तर तेल्हारा येथे तालुका अध्यक्ष. प्रितम चिमणकर
क्रिष्णा डामरे. सागर डांगे.
सागर गव्हाळे ,विनोद डामरे, संजय चिमणकर,समाज बांधव उपस्थित होते.चर्मकार समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात निवेदन देण्यात आले त्याच प्रमाणे बीड़ जिल्ह्यातील चर्मकार युवा का वर जातीवाचक शिविगाळ करुन मारहान करण्यात आली. तसेच औरंगाबाद,पुणे,जालना,परभणी, नागपूर व नाशिक ग्रामीन भागात या जिल्ह्यात देखील चर्मकार समाजावर अन्याय अत्याचाराचे सत्र वाढत आहे. याविषयी सरकार जाग आणण्यासाठी सर्व महाराष्ट्र भर आज आक्रोश निवेदन देण्यात आले आहे