• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 30, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले!

खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने उद्विग्न होत मांजरी येथील शेतकऱ्याने ११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले.

Team by Team
August 5, 2020
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, फिचर्ड, राज्य, शेती
Reading Time: 1 min read
82 1
0
मुगाचे पीक
13
SHARES
595
VIEWS
FBWhatsappTelegram

हातरुण : मांजरी परिसरात मुगाच्या पिकाला फूलधारणा झाल्यानंतर अचानक मुगाचे पीक शेंड्यावर सुकू लागले आहे. यामुळे पेरणीपासून लागलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने उद्विग्न होत मांजरी येथील शेतकऱ्याने ११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले. कोरोनाच्या संकटकाळात पैसा जवळ नसतानाही कर्ज काढून पेरणी केली. त्यानंतर पीक शेतात डोलू लागले; मात्र अचानक मूग पिकावर रोगाने आक्रमण केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यावेळी नुकसानग्रस्त भागाचे कृषी विभागाने सर्वेक्षण करून पीक विम्याच्या माध्यमातून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बाळापूर तालुक्यातील मांजरी येथील शेतकरी महेश गावंडे यांनी ११ एकर शेतात मुगाची पेरणी केली. पेरणीनंतर आंतरमशागत करून पीक फुलविले. कर्ज काढून शेतीला पैसा लावला; पण मूग पिकाने निराशा केली. अचानक हिरवेगार असलेल्या मुगाच्या पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली; मात्र रोगावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे हैराण झालेल्या शेतकºयाने ५० दिवसांच्या पिकाला अखेर उपटून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरातील अनेक शेतकºयांनी अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. खारपाणपट्ट्यात येत असलेल्या हातरुण, शिंगोली, मंडाळा, दुधाळा, खंडाळा, निमकर्दा, लोणाग्रा, हातला, मालवाडा या परिसरात मुगाचा पेरा यावर्षी बºयापैकी असल्याचे समजते. बियाणे, खते त्यानंतर पेरणीला मोठा खर्च लागला आहे. आणि अचानक मुगावर रोग आल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

फुलोºयावर आलेल्या मुगाच्या पिकावर रोग आल्याने पीक अचानक सुकू लागले. लागवडीचा खर्चही वसूल होणार नसल्याने ११ एकरातील मुगाचे पीक उपटून फेकले. आता पेरणीसाठी पैसा नसल्याने शासनाने पीक विम्याच्या माध्यमातून मदत द्यावी.
– महेश ज्ञानदेव गावंडे, शेतकरी, माजरी.

Tags: पीकशेतकरी
Previous Post

मुंबई येथे 11 सप्टेंबर रोजी पेन्शन अदालत तक्रार 6 ऑगस्ट पुर्वी पाठवावी

Next Post

जिल्हयात रुग्णात वाढ आज ३६ जण पॉझिटिव्ह

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
चाचणी

जिल्हयात रुग्णात वाढ आज ३६ जण पॉझिटिव्ह

msedcl

खूशखबर : महावितरण मध्ये ७ हजार जागांसाठी भरती होणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.