आकोट :- केन्द्र शासनाने फेरीवाले बांधवासांठी पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेची घोषणा केली त्या अंतर्गत फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायाकरीता कमी व्याजदराने १० हजार रुपये कर्ज बॕकेमार्फत मिळणार आहे.या योजनेची शहरात अंमलबजावणी करण्याकरीता नगरपरिषदे मध्ये शहर फेरीवाला समितीची बैठक पार पडली.
कोरोना विषाणूच्या पाश्वभुमीवर लाँकडाऊनमुळे रस्त्यावर छोटे फेरीवाले आर्थीक अडचणीत आले आहेत.या फेरीवाल्यावर आज उपासमीरीची वेळ आली आहे. फेरीवाल्यांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्याकरिता केद्र शासनाने जाहीर केलेल्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत कमी व्याज दराने पात्र लाभार्थ्यांना १० हजाराचे कर्ज बँकेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.या योजनेच्या अंमलबजावणी करण्याकरिता मुख्यधिकारी मनोहर अकोटकर यांच्या अध्यक्षतेखाली क्षेत्रीय स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये जिल्हा अग्रनी बँकेचे आलोक तरेनीया, गायकवाड,फेरीवाला संघटणेचे पदाधिकारी मो.बदरूजम्मा मो.अदील,मिलींद इंगोले,आनंद अग्रवाल,शहर स्तर संघाच्या अध्यक्षा सौ.लता कांबळे यांचा समावेश करण्यात आला.या समितीच्या माध्यमातुन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.या योजनेचा लाभ शहरातील भाजीपाला,फळ विक्रेता,खाद्यपदार्थ विक्रेता,चहा गाडे फिरते कापड विक्रेते, केशकर्तन दुकाने, चर्मकार,तसेच रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्याच्या व्यवसायावर लाँकडाऊन मुळे परिणाम झाला आहे.त्याचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा होणार आहे. नियमीत कर्जाची परतफेड केल्यास दिनदयाल अंन्त्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानाच्या माध्यमातून ७%व्याजाची रक्कम तर तिन महीन्याच्या अंतराने लाभार्थीना मिळणार आहे.शहरातील अधीकुत सी एस सी केद्रामध्ये आँनलाईन पध्दतीने अर्ज भरता येणार आहेत.यासाठी आधार कार्डची झेरॉक्स,आधार सलग्न असलेला मोबाईल क्रमांक,बँक खाते झेरॉक्स आवश्यक आहे. सदर बैठकीला आकोट नगर परिषदेचे कार्यलयीन पर्यवेक्षक गौरव लोंदे ,बाजार वसुली विभागाचे विजय रताळे नगरसेवक शिवदास तेलगोटे, नगरसेवक मंगेश लोणकर उपस्थित होते .
इच्छुक फेरीवाले यांनी अधीक माहीती करिता शहर अभियान व्यवस्थापक सुनीता तायडे व समुदाय संघटक निलेश देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नगराध्यक्ष हरिणारायण माकोडे,मुख्यधिकारी मनोहर आकोटकर यांनी केले आहे.