पातूर:- (सुनिल गाडगे)
काल कर्तव्यदक्ष आमदार श्री नितीन बाप्पू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पं स पातूर येथे आढावा बैठक झाली.या बैठकीमध्ये गावनिहाय घरकुल योजनेचा आढावा घेतला असता अधिकारी आणि कर्मचारी यांची तारांबळ उडाली कदाचित अशी आढावा बैठक त्यांची पहिलीच असावी कारण गावनिहाय आढावा बैठकीमध्ये घरकुल योजनेमधील छोट्या छोट्या गोष्टी आमदार साहेबानी तपासल्या असता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात त्रुटी आढळून आल्या .सामान्य लाभार्थ्यांना कसे गंडविले जाते त्याची कशी पिळवणूक केली जाते हे आमदार साहेबानी दाखवून दिले ,संगायचेच झाल्यास 2015 पासून मंजूर झालेली घरकुल आतापर्यंत का झाली नाहीत ,कुठे पाणी मुरत आहे म्हणजे 1 घरकुल करायला 5 वर्ष लागतात कशी ? अश्या 1 ना अनेक गोष्टींचा आमदार साहेबानी उहापोह केला .आणि आता या पुढे असे झाले नाही पाहिजे अशी ताकीद अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली ,सामान्य जनतेला कोणी त्रास दिला तर त्याची गय केली जाणार नाही अशी तंबी दिली.खर तर सर्वसामान्य गरीब जनतेसाठी नितीन बाप्पू देशमुख ज्या तळमळीने कामे करत आहेत हे आपल्या मतदार संघाचे भाग्यच म्हणावे लागेल .मागील लोकप्रतिनिधींनी काय केले ,किती केले मी या वादात पडणार नाही पण लोकप्रतिनिधींनी कश्या पद्धतीनी कामे करावी हे मात्र नितीन बाप्पू देशमुख दाखवून देत आहेत .या आढावा बैठकीला पं स सभापती सौ लक्ष्मी डाखोरे,गट नेता अजय भाऊ ढोणे ,तालुका प्रमुख रवी भाऊ मूर्तडकर ,उपसभापती,ऍड सुरज झडपे,अनिल इंगळे,गोपाल ढोरे,नंदुभाऊ डाखोरे ,गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी ,सर्व ग्रामसेवक,इतर कर्मचारी,तसेच अजय भाऊ देशमुख ,सोमिनाथ बोबडे,रामा ठाकरे,राहुल शेंगोकार ,बाळू वसातकर,किशोर देवकते,काशिनाथ घुगे पाटील,शांताराम पाटील,गोपाल मामा रोकडे शिवसेने चे पदाधिकारी, शिवसैनिक,आणि घरकुल संबंधित लाभार्थी उपस्तीत होते .