मुंबई: मुंबईसह राज्यात येत्या २४ ते ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्या गेली असून राज्यातील काही भागात मध्यम तर कुठ जोरादार पाउस सुरु असून येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. गेल्या 24 तासात मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. तर पुढच्या 24 ते 48 तासांत मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 48 तासात मराठवाडा व इतर शहरांमध्ये मध्यम/जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने (IMD), ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत देली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सादर केलेल्या बुलेटिनमध्ये आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.